मुंबई : पाळीव तसेच भटक्या लहान प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना दहन करण्यासाठी मालाड येथे दहनवाहिनी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता या ठिकाणी लवकरच प्राण्यांच्या शवागाराचीही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात ही सुविधा सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे.

महानगरपालिका प्रशासनाने मृत पाळीव व भटके श्वान, मांजरी आदींवर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२३ रोजी पीएनजीवर आधारित दहनावहिनी सुरू केली. या दहनवाहिनीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत प्राण्यांवर विनामूल्य दहनसंस्कार केले जातात. मात्र, सायंकाळी ६ नंतर एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी सकाळपर्यंत वाट पाहायला लागू नये, यासाठी प्राणीप्रेमींकडून सातत्याने शवागाराची मागणी केली जात होती. एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास आणि त्यावेळी जर प्राण्याचे प्रियजन त्याच्यापासून दूर असल्यास त्यांना प्राण्याला अखेरचा निरोप देता यावा, याहेतूनेही शवागार सुरू करण्यात येत आहे. २५ किलोचे दहा प्राणी एकाच वेळी शवागारात ठेवले जाऊ शकतात.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत

हेही वाचा >>>भूसंपादनाआधीच पुलाचे कंत्राट, गोरेगाव खाडीवरील प्रकल्पाच्या कामाला कंत्राटदार नेमणुकीनंतरही दिरंगाई

मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी उत्तर विभाग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालाडमध्ये शवागार सुरू करण्यात येत आहे. मालाडमध्ये दहनवाहिनी खुली करतानाच प्राण्यांच्या शवागाराचीही घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच प्राणीप्रेमींना शवागाराची प्रतीक्षा होती. अखेर वर्षभरांनंतर आता शवागाराची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे प्राणिप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे. स्वयंसेवी संस्था, तसेच कंत्राटदाराकडून या शवागाराची देखभाल करण्यात येणार आहे.

दरम्यान, मालाड येथील दहनासाठी करण्यात आलेली सुविधा देखभालीच्या कामानिमित्त २ डिसेंबरपासून तीन आठवडे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली आहे. देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर दहनवाहिनीसोबतच शवागारही सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader