आपल्यासोबत आणखी एका याचिकाकर्त्यास सहभागी करा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहारप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. वाढते वय आणि ढासळणारी प्रकृती यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्यासह आणखी एका व्यक्तीला याचिकाकर्ता म्हणून सहभागी करून घ्यावे, अशी विनंती हजारे यांनी याचिकेद्वारे केली आहे. याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा >>> मुंबईत ५५०० आशा सेविकांची भरती करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा

महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेतील २५ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा अण्णा हजारे २०१८ पासून पाठपुरावा करत आहेत. मात्र हजारे हे ८४ वर्षांचे असून वयपरत्वे त्यांची प्रकृतीही बिघडली आहे. प्रकरणाच्या सुनावणीला प्रत्येक दिवशी त्यांना अहमदनगरहून प्रवास करणे शक्य नाही, असे हजारे यांच्या वतीने अधिवक्ता सतीश तळेकर यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.जी.चपळगावकर यांच्या खंडपीठाला सांगितले. तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करून याचिकेवर मंगळवारी ठेवली. अण्णा हजारे यांनी त्यांच्यासह सह याचिकाकर्ता म्हणून माजी आमदार माणिक जाधव यांच्या नावाचा समावेश करण्याची विनंती केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare s file petition in bombay high court in maharashtra cooperative bank scam case mumbai print news zws