मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे विस्कळीत वेळापत्रक, प्रवेशपत्रे, रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील त्रुटी हा चर्चेचा विषय बनला असून, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी अर्ज केले आहेत. परंतु सदर पुनर्मुल्यांकनाचा निकाल जाहीर होण्यास विलंब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेअभावी उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे सर्व परीक्षांच्या पुनर्मुल्यांकनाचे निकाल तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी युवा सेनेने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांना पत्र पाठवून केली आहे.
हेही वाचा – शरद पवारांना भेटून आल्यावर आता काय भूमिका? अमोल कोल्हे म्हणाले, “त्यांनी मला…”
“गतसत्रामधील परीक्षांच्या पुनर्मुल्यांकनाचे निकाल जाहीर न करता आगामी सत्र परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परिक्षेनंतर विद्यार्थ्यांना सात दिवसांच्या आत पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करावा लागतो आणि सदर पुनर्मुल्यांकनाचा निकाल १५ दिवसांच्या आत जाहीर होणे अपेक्षित आहे. परंतु विद्यापीठाने डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेच्या पुनर्मुल्यांकनाचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. तर सरसकट सर्व विद्यार्थ्याना अनुत्तीर्ण दाखविले आहे. या सर्व कारभारामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. ही बाब अत्यंत चुकीची व विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण करणारी आहे,” असे युवा सेनेचे सहसचिव ॲड. संतोष धोत्रे यांनी सांगितले.