मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रमांचा विकास ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे पोर्टल सदैव सुरू राहील असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.हे फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून त्यात महेश कोठारे, स्वप्निल जोशी, संदीप घुगे, केतन मारु यांचा समावेश असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी चित्रपट, दूरचित्रवाणीवरील विविध चॅनलच्या मराठी मालिका, कार्यक्रम तसेच ओटीटीवरील मराठी चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मितीकरिता पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि वित्त पुरवठादार इत्यादींना एका व्यासपीठावर आणून एकमेंकाशी समन्वय साधणे, त्यांना नियमितपणे सल्ला देणे आणि बिगर आर्थिक साह्य इत्यादी बाबी समितीच्या कार्यकक्षेत येतील. राज्यातील स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती इत्यादींच्या जीवनावर आधात्त चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेब मालिका इत्यादी निर्मितीसाठी प्रयत्न करणे तसेच शासनाला अशा प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य आणि सल्ला देण्याचे काम ही समिती करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announcement of sudhir mungantiwar a portal for the development of marathi film series sector amy