आझाद मैदान येथील हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या आणखी १४ आरोपींना सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने याप्रकरणातील चार आरोपींना दिलेल्या जामिनाच्या पाश्र्वभूमीवर सत्र न्यायालयाने गेल्याच आठवडय़ात १४ आरोपींना जामीन दिला होता. त्यानंतर मंगळवारी आणखी १४ जणांना जामीन मंजूर केला. त्यामुळे याप्रकरणी जामीन मिळालेल्या आरोपींची संख्या ३२ झाली आहे. या हिंसाचार प्रकरणात सुरुवातील एकूण ६३ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यातील पाचजणांविरुद्ध काहीच पुरावा पुढे न आल्याने त्यांना नंतर दोषमुक्त करण्यात आले होते.
आझाद मैदान हिंसाचाराप्रकरणी आणखी १४ जणांना जामीन
आझाद मैदान येथील हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या आणखी १४ आरोपींना सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.
First published on: 07-11-2012 at 03:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another 14 get bail in azad maidan riot case