प्रवाशांचा प्रवास गारेगार करण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत ८०० वातानुकूलित बस मुंबईत दाखल होणार आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात समाविष्ट होणाऱ्या या सर्व बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून यामध्ये एकमजली, दुमजली आणि प्रीमियम बसचा समावेश आहे. यामुळे बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसच्या तुलनेत भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढणार आहे.

हेही वाचा >>> कागदपत्रांअभावी  शवविच्छेदन रखडले ; नंदुरबार बलात्कार-हत्याप्रकरणी दिरंगाई सुरूच

Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल

बेस्ट उपक्रमाने खर्च कमी करण्यासाठी स्वमालकीऐवजी भाडेतत्त्वावरच बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्ट उपक्रमाकडे डिझेल, सीएनजी, विजेवर धावणाऱ्या बसबरोबरच हायब्रीड बसही आहेत. बेस्टच्या ताफ्यात एकूण तीन हजार ६७२ बस असून यापैकी एक हजार ८३६ बेस्टच्या मालकीच्या आणि उर्वरित भाडेतत्त्वावरील आहेत. येत्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या दहा हजारपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. उपक्रमाने डिसेंबर २०२२ पर्यंत ८०० वातानुकूलित बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २०० आरामदायी अशा प्रीमियम बस असून या बसगाड्यांमधील आसन ॲपद्वारे आरक्षित करण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर १०० दुमजली बस आणि उर्वरित १२ मीटर लांबीच्या एकमजली वातानुकूलित बसड्यांचाही त्यात समावेश आहे. या सर्व बस वीजेवर धावणाऱ्या आहेत.

येत्या डिसेंबरपर्यंत ८०० वातानुकूलित बस ताफ्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट असून यामध्ये दुमजली, एकमजली आणि प्रीमियम बसचा समावेश आहे. – लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

हेही वाचा >>> शेतकरी कर्ज वाटपात बनवाबनवी ; ३ टक्के लाभासाठी जुने कर्ज न फेडताच नवीन कर्जाचे वाटप

दुमजली वातानुकूलित बस ऑक्टोबरमध्ये
बेस्टच्या वातानुकूलित दुमजली बसची सध्या पुण्यात चाचणी सुरू आहे. चाचणी पूर्ण होताच दुमजली बस प्रत्यक्षात सेवेत येण्यासाठी सप्टेंबरऐवजी ऑक्टोबर २०२२ उजाडणार आहे. ऑक्टोबरपासून तीन दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत येतील.

स्वमालकीच्या बसला विराम
बेस्ट उपक्रमाने खर्च कमी करण्यासाठी स्वमालकीऐवजी भाडेतत्त्वावरच बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण बसताफा सात हजार झाल्यानंतरच स्वमालकीच्या बस घेण्यात येतील, अशी माहिती लोकेश चंद्र यांनी दिली. सध्या बेस्ट उपक्रमाकडे मालकीच्या १ हजार ८३६ बसगाड्या आहेत.