मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेविरोधात आणखी एका व्यक्तीने गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. महिलेनेही अशाच पद्धतीने त्यालाही धमकावल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाने आरोपी महिलेच्या पोलीस कोठडीत २५ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

मुंडे यांनी या महिलेविरुद्ध खंडणी मागितल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला होता. या वेळी मुंडेनी काही पुरावेही सादर केले होते. त्यानंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात खंडणी व धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारे आपल्यालाही धमकावल्याची तक्रार मनीष धुरी नावाच्या व्यक्तीने गुन्हे शाखेकडे केली आहे. त्याबाबत पोलीस आरोपी महिलेची चौकशी करणार आहेत. या प्रकरणी आणखी तक्रारदार गुन्हे शाखेकडे येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader