दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून आणखी २१६० कोटी रुपयांचा मदतनिधी महाराष्ट्राला मिळाला असून, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्रकडून राज्याला सातत्याने मदत होत आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारही मोठय़ा प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची मदत यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ४२४८.५९ कोटी रुपये केंद्र सरकारकडून राज्याला मिळाले.