गेल्या काही वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीकरिता वटहुकूम काढण्यात येणार असून त्याचा मसुदा शुक्रवारी राज्यपालांकडे पाठविण्यात आला. त्यामुळे राज्यपालांच्या मान्यतेनंतर येत्या दोन दिवसात हा वटहुकूम अंमलात येईल असे मंत्रालायतील सूत्रांनी सांगितले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या कायद्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या हयातीत हा कायदा होऊ शकला नाही. मात्र आता दाभोलकर यांना श्रद्धांजली म्हणून जादूटोणा विरोधी कायदा राज्यात लागू करण्याचा निर्णय सरकराने घेतला असून त्याबाबतचा वटहुकूम काढण्यात येणार आहे. या वटहुकूमाचा मसुदा विधि व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर सामाजिक न्याय विभागाने आज राज्यपालांना पाठविला. मात्र राज्यपाल मुंबईबाहेर असून उद्या ते मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात या वटहुकूमाला मान्यता मिळेल आणि हा कायदा अंमलात येईल असेही सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा