मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागमीसाठी सट्टेबाज नरेश गौर याने केलेला अर्ज विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. गौर सध्या जामिनावर बाहेर असून उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> भटक्या श्वानांना जेवण देताना अश्लील शेरेबाजी, जाब विचारल्यावर महिलेला मारहाण अन्…; बोरिवलीत धक्कादायक घटना

या प्रकरणी तसेच व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याबरोबर गौर यालाही अटक करण्यात आली होती. गौर याच्यावर वाझे यांना सिम कार्ड पुरवल्याचा आरोप आहे. गौर याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्याने दोषमुक्तीच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

हेही वाचा >>> मुंबई:पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

गौर याला या प्रकरणात अटक केली असली तरी त्याच्या अटकेसाठी तपास यंत्रणेकडे ठोस कारण नसल्याचा दावा गौर याने दोषमुक्तीच्या मागणीसाठी केलेल्या अर्जात केला होता. प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाझे यांना सिमकार्ड पुरवून ते चालू करून देणे एवढ्यापुरताच गौर याचा संबंध होता. वाझे यांनीही त्याच्यावर सिमकार्ड उपलब्ध करण्यासाठी दबाव टाकला असावा, अशी शक्यताही गौर याने अर्जात व्यक्त केली होती.