लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेले स्फोटके प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला माजी पोलीस सुनील माने यांना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. माने यांचा गुन्हयात सहभाग असल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळताना नमूद केले.

MIT suspends Indian-origin PhD student
MIT Suspends PhD Student : पॅलेस्टिनवर लेख लिहिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतील MIT मधून हकालपट्टी; हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
wardha after DNA test and medical evidence real culprit cought and reveal teacher wast father of child
प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक

याचिकाकर्त्याविरोधात दाखल गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे आहेत. त्यामुळे, प्रकरणाच्या टप्प्यावर माने यांना जामीन मंजूर केल्यास तो पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे, असे नमूद करून न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने माने यांना जामीन नाकारला.

आणखी वाचा-बेकायदा फलकबाजीवरील तोंडदेखल कारवाईवरून उच्च न्यायालयाचा संताप, न्यायालयाला हलक्यात न घेण्याचा इशारा

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सादर केलेल्या पुराव्यांवरून मनसुख हिरेन याचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित कट रचला गेल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असेही न्यायलयाने आदेशात नमूद केले. हिरेन याच्या हत्येमध्ये माने यांचा सहभाग दर्शवण्यासाठी तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे आहेत. माने हे पोलीस आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडून पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (युएपीए) कठोर तरतुदींअंतर्गत दाखल गुन्हे खूपच गंभीर आहेत. त्यामुळे, या टप्प्यावर माने याला जामिनावर सोडणे न्याय्य आणि योग्य ठरणार नाही, असेही खंडपीठाने माने यांची जामिनासाठीची याचिका फेटाळताना नमूद केले. दरम्यान, आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचा दावा करून माने यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती.

Story img Loader