मुंबई: नवनवीन सवलती घेऊन येणाऱ्या ऑनलाइन खरेदी-विक्री संकेतस्थळांच्या काळातही ग्राहकांना आकर्षित करणारा, त्यांचा विश्वास टिकवून ठेवणारा अपना बाजार सोमवारी (९ मे) अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करत आहे. ‘ग्राहक सेवा’ हेच ध्येय समोर ठेवून गेली ७४ वर्षे सुरू असलेल्या अपना बाजारच्या वाटचालीने जागतिकीकरण आणि खासगीकरणाच्या लाटेमध्ये सहकार चळवळ लयाला जाण्याची भीती खोटी ठरवली आहे.

मुंबईतील नायगाव दादर परिसरातून गिरणी कामगारांच्या सहकाऱ्याने सहकार चळवळ सुरू झाली. दादासाहेब सरफरे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ९ मे १९४८ रोजी नायगाव कामगार ग्राहक सहकारी मंडळ लिमिटेड या एका लहानशा विक्री दालनापासून अपना बाजारची सुरुवात केली. धान्य, कडधान्य आणि रेशन यांचा पुरवठा करून जनसामान्यांना सेवा देण्यास सुरुवात झाली. कालांतराने संस्थेने कापड, औषधविक्रीही सुरू केली. भारतात मॉल संस्कृती फोफावण्यापूर्वी त्याचे छोटे स्वरूप असलेले डिपार्टमेंटल स्टोअर १९६८ मध्ये संस्थेने नायगाव येथे सुरू केले. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या संस्थेने दूध, मसाले, लोणची आणि डाळी यांच्या उत्पादन क्षेत्रातही पदार्पण केले आणि ग्राहकांचा विश्वासही जिंकून घेतला. हळूहळू या संस्थेची वृद्धी होऊन आज अपना बाजार या नावाने प्रसिद्ध असलेली मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सरकारी संस्था ही भारतातील एकमेव बहुराज्य ग्राहक सहकारी संस्था ठरली आहे. संस्थेने मुंबई, मुंबई उपनगरांसह कोकणातही विस्तार केला आहे.

what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
Is ESOP or RSU better for employee welfare
कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?
Sensex retreats below 78 thousand due to selling pressure
विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सची ७८ हजारांखाली पीछेहाट
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी
Muralidhar Mohol
सहकारातील त्रिस्तरीय पतरचनेची साखळी मजबूत करण्याची गरज- मुरलीधर मोहोळ
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री

अपना बाजारने अनेक लहान ग्राहक सहकारी संस्थांना आपल्यात सामावून घेतले. सहकार क्षेत्राचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि अपना बाजार ही संस्कृती जोपासण्यासाठी संस्थेने अनेक स्तरांवर प्रयत्न केले आहे. बाजारपेठेत सध्या स्पर्धा मोठय़ा प्रमाणात असतानाही अपना बाजार ठामपणे उभा आहे.

जडणघडणीत मान्यवर

संस्थेच्या स्थापनेपासून सरफरे, एन.के. सावंत, ह.ना. पाटील, उपेन्द्र चमणकर, सुरेश तावडे, विष्णू आंग्रे आदींनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कामकाज पाहिले. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, अहिल्याताई रांगणेकर यांच्यापासून कलापथकातून कारकीर्द घडवणारे अभिनेते दादा कोंडके हेही अपना बाजारशी जोडले गेले होते. सध्या अध्यक्ष श्रीपाद फाटक, उपाध्यक्ष अनिल गंगर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ सध्या कार्यरत आहे.

Story img Loader