Apoorva Mukhija : प्रसिद्ध यूट्यूबर अपूर्वी मुखिजाने सोशल मीडियावर दोन महिन्यांनी कमबॅक केलं आहे. इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील वादामुळे तिने दोन महिने सोशल मीडियापासून लांब राहणंच पसंत केलं. दरम्यान अपूर्वाने एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अनोळखी लोकांनी तिच्या घराचा पत्ता शोधला आणि तिला चित्रविचित्र मेसेज केले, तसंच डीएममध्येही मेसेज केले, बलात्काराच्या धमक्या दिल्या असं म्हटलं आहे. त्यामुळे तिचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

अपूर्वा मुखिजाने काय म्हटलं आहे व्हिडीओत?

मला रेड फ्लॅग दाखवणाऱ्या सगळ्यांचं माझ्या व्हिडीओत स्वागत आहेत. माझं नाव अपूर्वा आहे पण आजकाल सगळे मला हेच म्हणतात की तू तीच आहेस ना जी रणवीर अलाहबादिया बरोबर त्या शोमध्ये होतीस आणि वाट्टेल तसं बोलत होतीस. मला अनेकांनी हे सल्ले दिले की मी त्या सगळ्या प्रकरणाबाबत बोलायलाच नको. जे झालं ते झालं म्हणत सोडून दिलं पाहिजे. उलट तुला लोकांनी विचारलं तर सांग की मी ती नव्हतेच माझं AI व्हर्जन त्या ठिकाणी बसलं होतं. काही घडलंच नाही असं वाग. अनेकदा नॉर्मल लोक असले सल्ले ऐकतातही. पण मी नॉर्मल नाही. मागच्या दोन महिन्यांत माझी कहाणी अनेकांनी सांगितली आहे. पण कुणीही ती नीट सांगू शकलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची ओरिजनल गोष्ट जाणून घ्यायलाच हवी. सगळ्यांनी ReadIt वरुन सगळं काही कॉपी केलं आहे. पण माझं म्हणणं काय आहे? ते कुणालाच माहीत नाही. तसंच मागच्या दोन महिन्यांत अनेकांनी व्ह्यूज, क्लाऊड्स यासाठी माझ्या फोटोंचा मनसोक्त वापर केला आहे. मग मी माझा चेहरा का वापरु नको मलाही व्ह्यूज हवेतच. असं अपूर्वा म्हणते आहे.

मला लेटेंटमध्ये जायचं नव्हतं

पुढे अपूर्वा म्हणते, “लेटेंट च्या शोमध्ये मला जायचं नव्हतं, मला काही नवे मित्र वगैरे नको होते, ते सगळं करुन मला कंटाळा आला. मला समय रैना आवडतो. समय मला आवडतो म्हणून मी त्या शो ला गेलो होतो. मला त्याने समोरुन विचारलं की लेटेंट करशील का? मला खरंच कळलं नाही हे काय होतं. मी समय मला भेटला हे आणि मी लेटेंटमध्ये येणार हे सगळ्यांना सांगितलं. पण दीड महिना त्याचा मेसेज आलाच नाही. दीड महिना वाट पाहिल्यानंतर मी लेटेंट ओव्हररेटेड सांगू लागले होते. मला रिजेक्ट केल्याचा मला राग आला होता. मी दहा दिवस लेटेंट कसं वाईट आहे हे सांगत होते. हे सगळं ऑगस्ट २०२४ मध्ये घडलं होतं. दीड महिन्यानंतर पुढचे जे दहा दिवस गेले ते असे होते. मग मी एक दिवस समयला फोन केला आणि विचारलं की तू मला शोमध्ये बोलवणार होतास त्याचं काय झालं? त्यावर तो म्हणाला मी विदेशात आहे. परत भारतात आलो की तुझ्याशी चर्चा करतो. आपण लेटेंट नक्की करत आहोत. मग मी पुन्हा लेटेंटच्या प्रेमात पडले आणि सगळ्यांना सांगितलं की मी या शोमध्ये येते आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याचा मेसेज आला आणि मी त्या शोमध्ये गेले.” असं अपूर्वाने सांगितलं.

मी त्या शोमध्ये नर्व्हस झाले होते-अपूर्वा मुखिजा

तो सगळा शो सहा ते सात तासांचा होता, त्यात पहिल्या काही तासांमध्ये मी काहीच बोलले नाही, एखादा जोक मी मारला होता. ब्रेक झाला ब्रेकनंतर मी माझी मॅनेजर आणि इतर टीमकडे मी रडू लागले. मी हमसून हमसून रडत होते. मी या शोमध्ये का आले होते? त्यावेळी समय आला, त्यानंतर मी शांत झाले. स्वतःला कसंबसं आवरलं. समयने सांगितलं की तू असं काही समजू नकोस. तू युट्यूबर आहेस इन्फ्लुएन्सर आहेस तर घाबरु नकोस. मग मी ठरवलं की आपण जोक करायचा. मला तेव्हा काय घडलं हे माहिती नव्हतं. मी त्यावेळी विचार करुन एक वाक्य बोलले.. पण ते वादग्रस्त ठरलं. मलाच त्याचं वाईट वाटलं.

मला बलात्कार आणि अॅसिड फेकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या-अपूर्वा मुखिजा

“लेटेंट झाल्यानंतर जे काही घडलं त्यानंतर काय होतंय याची मला कल्पनाच नव्हती. जे काही आपण चित्रपटांमध्ये बघतो तसं घडलं. पण मला लोकांनी इतका त्रास दिला की त्याची काही सीमाच नाही. जे घडलं त्यातून मी धडा शिकले आहे. मला ते वाक्य तसं बोलायचं नव्हतं. मी त्या एका वाक्यानंतर एक किंवा दोनच जोक केले. त्याचंही मला वाईट वाटलं त्याबाबत मला पश्चात्ताप आहे. जो एपिसोड शूट झाला होता तो तीन महिन्यांनी पोस्ट करण्यात आला होता. लोकांनी माझा पत्ता शोधण्यास सुरुवात केली. मला डीएममध्ये वाट्टेल तसे मेसेज आले होते. मला बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या. तसंच चेहऱ्यावर अॅसिड फेकू अशा धमक्या देण्यात आल्या. एक मेसेज मला सातत्याने येत होता, त्यात तो मला सांगत होता की मला माहीत आहे तू कुठल्या इमारतीत राहतेस? मी आता तुझ्याबरोबर हे-हे करेन. असं तो मला सातत्याने सांगितलं. मी आजवर हे सगळं फक्त चित्रपटांमध्ये पाहिलं होतं. हे माझ्यासह घडत होतं, मलाही कळत नव्हतं की हे का घडतं आहे? मी प्रचंड घाबरुन गेले.” असं अपूर्वाने सांगितलं.

अपूर्वा मुखिजा कोण आहे?

सोशल मीडियावर अपूर्वा ‘द रिबल किड’ या नावाने ओळखली जाते. अपूर्वाचे इन्स्टाग्रामवर २.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर ५ लाख सबस्क्रायबर आहेत. करोना काळातील इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकून ती प्रसिद्धीस आली होती. मुळची नोएडाची असलेल्या अपूर्वाने मणिपाल विद्यापीठ, जयपूर येथून शिक्षण पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर अपूर्वाकडे आज गुगल, ॲमेझॉन, मेटा, स्विगी, मेबेलिन असे आंतरराष्ट्रीय ब्रँड आहेत. २०२३ मध्ये तिने अभिनय क्षेत्रातही पदार्पण केले होते.