Apple iPhone 16 Sale In india : जगभरात प्रसिद्ध असलेल्या ॲपल कंपनीने काही दिवसांपूर्वीच आयफोन १६ या नव्या मोबाइल फोन मॉडेलची घोषणा केली होती. तसेच १३ सप्टेंबरपासून प्री बुकिंगही सुरु करण्यात आली होती. दरम्यान, आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच देशभरातील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांच्या रांगा बघायला मिळत आहेत. मुंबईच्या बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेरही ग्राहकांची झुंबड बघायला मिळाली आहे.

मुंबईतील बीकेसी भागात असलेले अ‍ॅपलचे स्टोअर हे देशातील पहिल्या काही अ‍ॅपल स्टोअरपैकी एक आहे. याठिकाणी फोन खरेदी करण्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. राज्यातील विविध भागांतून नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे आयफोन १६ खरेदी करण्यासाठी परराज्यातील ग्राहकही मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे. मुंबई व्यक्तीरिक्त देशातील इतर भागातही अशाच प्रकारची गर्दी बघायला मिळत आहेत. देशातील राजधानी असलेल्या दिल्लीतील साकेत भागातील अ‍ॅपल स्टोअरबाहेरही ग्राहकांनी रांगा लावल्या आहेत.

Alphonso Mangoes arrived in APMC market Navi Mumbai
एपीएमसीत हापूस दाखल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Crime
Delhi Crime : चुलत बहिणीशी प्रेमसंबंध, लग्नाचा तगादा लावल्याने हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून…; पोलिसांनी ‘असा’ लावला घटनेचा छडा
Ola, Uber govt notices
Ola, Uber Govt Notices : iPhone वापरता की अँड्रॉइड याचा कॅबच्या भाड्यावर फरक पडतो? केंद्राच्या नोटीशीनंतर ओला, उबरने दिलं उत्तर
Centres Notice to Ola, Uber : iPhone आणि अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यासांठी आकारलं जातंय वेगवेगळं भाडं? ओला, उबर कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस
Image Of Vijay Shekhar Sharma
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल
Coldplay in Mumbai local Coldplay fans bring ‘concert vibe’ to Mumbai local: ‘This city can do anything’ video viral
खरा कोल्ड प्ले कॉन्सर्ट तर मुंबई लोकलमध्ये झाला; ‘त्या’ रात्री मुंबई लोकलमध्ये काय घडलं पाहाच, VIDEO होतोय तुफान व्हायरल
sambhav
भारतीय लष्कर वापरत असलेला संभव स्मार्टफोनमध्ये कोणत्या खास गोष्टी आहेत? जाणून घ्या…

हेही वाचा – iOS 18 update : आज रात्री आयफोन होणार अपडेट; लॉक, हाईड ॲप्ससह असणार फीचर्स; ‘या’ यादीत तुमच्या फोनचं नाव आहे का बघा

आयफोन १६ ची किंमती किती?

भारतात iPhone 16 ची (१२८ जीबी) किंमत ७९,९०० पासून सुरू होईल. त्यानंतर २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेजची किंमत यापेक्षा पुढे असेल. आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपये, तर आयफोन १६ प्रोची किंमत १,३४,९९० रुपये आणि आयफोन १६ प्रो मॅक्स १,५९,००० रुपये असेल. चारही मॉडेलची ही मुळ किंमत असून स्टोरेजच्या पर्यायानुसार किंमत वाढेल.

हेही वाचा – iPhone 16 विकत घ्यायला दुबईला जाणं परवडेल का? आधी असेल, पण आता नाही; वाचा काय आहे आर्थिक गणित…

आयफोन १६ ची वैशिष्ट्ये काय?

आयफोन १६ मध्ये ६.१ इंच स्क्रीनसह, तर आयफोन १६ प्लसमध्ये नवीन A18 बायोनिक प्रोसेसरसह नवीन कॅमेरा बटण आहे. या कॅमेरा बटणामध्ये नवीन व्हिज्युअल इंटेलिजेन्स फीचर्स आहेत, जी कॅमेऱ्याचा वापर करून तुम्हाला झटपट उत्तरे देण्यास मदत करतील. याशिवाय आयफोन १६ मध्ये ४८-मेगापिक्सेल फ्युजन कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याद्वारे तुम्ही आता २x टेलिफोटो झूम करू शकता. मॅक्रो फोटोसाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे.

आयफोन १६मध्ये प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युटही आहे, जे जनरेटिव्ह मॉडेल्सला ॲक्सेस करेल. आयफोन आता युजर्सना टूल्सचा अ‍ॅक्सेस देतो; ज्यामुळे तुमचे लिखाण तुम्ही तपासून बघू शकता. त्या मजकुराचे प्रूफ रिडिंग म्हणजे मजकुरातील चुका शोधून, त्या दुरुस्त करू शकता. तसेच सिरी सेवाही एआयच्या मदतीने अधिक स्मार्ट झाली आहे. तुम्ही फक्त ॲपल इंटेलिजेन्सच्या मदतीने सिरीला एखादी गोष्ट सांगा. ती तुमचे काम अगदी चुटकीसरशी करेल.

हेही वाचा – अन्वयार्थ : उत्पादनातील ‘आयफोनिक’ संधी

आयफोन १६ प्रो मॅक्सची वैशिष्ट्ये काय?

आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये ६.९ इंचांची मोठी स्क्रीन आहे.आतापर्यंतची सर्वोत्तम आयफोन बॅटरी लाइफ या फोनमध्ये असणार आहे. १६-कोर न्यूरल इंजिनसह नवीन ३ नॅनो मीटर A18 प्रो चिपद्वारे समर्थित असलेला हा आयफोन फास्टर रे ट्रेसिंग, प्रो रेस व्हिडीओ रेकॉर्डिंग, जलद USB ट्रान्स्फर आदी युनिक फीचर्ससह सादर झाला आहे. या फोनमध्ये आता 48MP फ्युजन कॅमेरा, 5x टेलीफोटो कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. एखादा फोटो काढताना हा कॅमेरा‌ प्रोफेशनल फोटोग्राफिक आणि क्रिएटिव्ह स्टाईल ऑफर करतो. तसेच आयफोन १६ प्रो फोनमध्ये 4K120 फ्रेम्स प्रतिसेकंदासह सिनेमॅटिक स्लो मोशनदेखील आहे. स्टुडिओ-क्वालिटी माइकपासून नवीन साउंड एडिटिंगपर्यंत, iPhone 16 Pro या स्मार्टफोनमध्ये रेअर ऑडिओ कॅपेबिलिटीजसुद्धा देण्यात आल्या आहेत.

Story img Loader