मुंबई : आयफोनचे  आकर्षण लक्षात घेऊन भारतात शुक्रवारी  ‘अ‍ॅपल आयफोन १५’ या मालिकेतील मोबाइल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. कंपनीच्या बीकेसी येथील दुकानाबाहेर या मोबाइलच्या खरेदीसाठी अ‍ॅपलप्रेमींची झुंबड उडाली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परराज्यांतूनही ग्राहक खरेदीसाठी मुंबईत आले होते.

हेही वाचा >>> iPhone 15 खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ ठिकाणी सुरू आहेत बेस्ट ऑफर्स; एकदा पाहाच

Trade Connect, trade, Online Forum,
व्यापाराशी निगडित माहितीसाठी ‘ट्रेड कनेक्ट’, केंद्राकडून आयात-निर्यातदारांसाठी ऑनलाइन मंच
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
car market india
हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?
new ST buses, Tender process, ST bus,
पाच हजार नवीन एसटी बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार, १३१० खासगी एसटी बससाठी निविदा प्रक्रिया सुरू
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
online betting apps marathi news
ऑनलाइन बेटिंग ॲप आता ईडीच्या रडारवर… १ लाख कोटींचा महसूल बुडवणाऱ्या बेटिंग ॲपच्या जाळ्यात आजही कित्येक का फसतात?
case registered against four sellers along with director of company in Pune for selling bogus fertilizer by Gujarat company
गुजरातच्या कंपनीकडून बोगस खत विक्री, पुण्यातील कंपनीच्या संचालकांसह चार विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
pune based software company indicus partnerhip with japan seiko solutions
पुणेस्थित इंडिकसची ‘सेको’शी भागीदारी

भारतात विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या ‘आयफोन १५’च्या मालिकेमध्ये चार मॉडेलचा समावेश आहे. ‘आयफोन १५’, ‘आयफोन १५ प्लस’, ‘आयफोन १५ प्रो’ आणि ‘आयफोन १५ प्रो मॅक्स’ यांचा त्यामध्ये समावेश आहे. अ‍ॅपल कंपनीने गुलाबी, पिवळय़ा, हिरव्या, निळय़ा आणि काळय़ा रंगात हे मोबाइल विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.

हेही वाचा >>> VIDEO: भारतात लॉन्च झाला विवोचा ‘हा’ स्मार्टफोन; २ हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि…, फीचर्स एकदा बघाच

‘आयफोन १५’ची किंमत ७९ हजारांपासून १ लाख ५९ हजार ९०० रुपयांदरम्यान आहे. ग्राहकांना ‘आयफोन १५ प्लस’साठी ८९ हजार रुपये, ‘आयफोन १५ प्रो’साठी १ लाख ३४ हजार ९०० रुपये द्यावे लागणार आहेत. ‘आयफोन प्रो’ आणि ‘आयफोन १५ प्रो मॅक्स’ अ‍ॅपलचे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके ‘मॉडेल’ आहेत. ‘आयफोन १५’ सीरिजचे हे फोन १२८ जीबी, १५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टीबी साठवण क्षमतेत उपलब्ध आहेत. बीकेसीच्या दुकानात अहमदाबादवरून खास अ‍ॅपल मोबाइलच्या खरेदीसाठी मुंबईला आलेला तरुण चक्क सतरा तासांपासून रांगेत उभा होता. इतकेच नव्हे, तर एका तरुणाने आयफोन १५ खरेदीसाठी बंगळूरुवरून विमानाने प्रवास करत मुंबई गाठली. तसेच अभिनेता रणवीर सिंग यानेही शुक्रवारी बीकेसीतील दुकानाला भेट दिली.