मुंबई : MHADA Houses Lottery 2023 म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रातील ५ हजार ३०९ घरांच्या  सोडतीसाठीची जाहिरात उद्या, शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. तसेच याच दिवसापासून ऑनलाइन अर्जविक्री-स्वीकृतीसही सुरुवात होणार आहे. ही सोडत नोव्हेंबरमध्ये काढण्यात येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण मंडळाने मे २०२३ मध्ये ४ हजार ६५४ घरांसाठी सोडत काढली. मात्र, सोडतीतील अनेक घरे विकली नाहीत. तसेच प्रथम प्राधान्य आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या सोडतीत शिल्लक घरांसह म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनेतून उपलब्ध झालेल्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला होता.

जुलै-ऑगस्टमध्ये ही सोडत काढण्यात येणार होती. मात्र, काही कारणाने ही सोडत लांबणीवर पडली. आता मात्र ही सोडत मार्गी लागणार आहे.  कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ५ हजार ३०९ घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे, तर या घरांसाठी शुक्रवारी, १५ सप्टेंबरला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवारपासूनच अर्जविक्री-स्वीकृती सुरू होणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही उत्पन्न गटांतील घरांचा समावेश आहे, तर २० टक्के सर्वसमावेशक योजना, प्रथम प्राधान्य, म्हाडा गृहनिर्माण आणि पंतप्रधान आवास योजना अशा योजनेतील ही घरे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Application sale for 5 thousand 309 houses of mhada from tomorrow ysh