लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या गृहप्रकल्पांची घोषणा करून घरविक्रीला सुरुवात करण्यापूर्वी संबंधित विकासकांनी महारेरा नोंदणीसाठी त्वरित अर्ज करावेत,असे आवाहन महारेराने विकासकांच्या संघटनांना केले आहे.

सणासुदीच्या काळात, त्यातही साडेतीन मुहूर्तावर अर्थात गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्याची भारतीयांची मानसिकता आहे. त्यामुळे या मुहूर्तावर घरांच्या विक्रीत मोठी वाढ होते. या मुहूर्तावर घर खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल लक्षात घेऊन विकासक नवीन प्रकल्पाची घोषणा करतात वा नवीन प्रकल्पातील घरांची विक्री करतात.

आणखी वाचा-मुंबई: ट्रेलरने दुचाकीस्वाराला चिरडले

नवीन प्रकल्प किंवा नव्या प्रकल्पातील घरांची विक्री करण्यासाठी, जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. या नोंदणीशिवाय घरांची विक्रीच करता येत नाही. असे असताना आता नवरात्र, दसरा आणि दिवाळीजवळ आल्याने नवीन प्रकल्प सुरू करणाऱ्या विकासकांनी शक्य तितक्या लवकर नोंदणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन महारेराने केले आहे. विकासकांच्या संघटनांना एक पत्र पाठवून महारेराने वरील आवाहन केले आहे. यासंबंधीचे पत्र महारेराने आपल्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apply in time for registration of new projects during festive period says maharera mumbai print news mrj