मुंबई : लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई हे पल्बिक चॅरीटेबल ट्रस्टद्वारे चालवले जाणारे हॉस्पिटल आहे जे कीर्तिलाल मणिलाल मेहता यांनी १९७८ मध्ये स्थापन केले होते. हॉस्पिटलची विश्वस्त मंडळाची नियुक्ती ही लीलावती हॉस्पिटलच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून नवनियुक्त विश्वस्त मंडळात किशोर मेहता व चारू मेहता हे कायमस्वरुपी संस्थापक स्थायी विश्वस्त असून, राजीव के. मेहता, राजेश के. मेहता आणि प्रशांत के. मेहता स्थायी विश्वस्त म्हणून कार्यरत असणार आहे. त्यांच्यासोबतच संजय श्रॉफ, किरण शाह, तात्याबा पालवे, राकेश खन्ना, मोहित माथूर व सौरव शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी. नवीन मंडळाचे नेतृत्व किशोर मेहता आणि चारू मेहता करणार असून त्यांनी उच्च आरोग्य सेवा मानक जपण्याचा विश्वास दिला आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी धर्मादाय प्रकल्पांद्वारे भारतातील समुदायांना सेवा देण्याची त्यांची योजना आहे. राजीव के. मेहता यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय प्रगती साधत मुंबईतील आरोग्य सेवा क्षेत्राचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था आणि समाजकल्याण गटांसोबत भागीदारी करून मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद

हेही वाचा – रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वांना आरोग्य या संकल्पनेचा विचार करून सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीची पर्वा न करता नियमित आरोग्य तपासणी शिबिरे राबविण्याची योजना असल्याचे किशोर मेहता यांनी सांगितले. लीलावती हॉस्पिटलचे स्थायी विश्वस्त राजेश के. मेहता यांनी रुग्णांना आजारातून लवकर बरे होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक पद्धतीचा वापर करत उत्तमोत्तम आरोग्य सेवा पुरविण्यावर भर दिला.