अक्षय मांडवकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी तीन सापळे सापडले

गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतून (फिल्म सिटी) उघड झालेल्या बिबटय़ा आणि सांबराच्या शिकारीच्या प्रकरणानंतर गुरुवारी वन विभाग आणि फिल्म सिटी प्रशासनामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत चित्रनगरी प्रशासनाकडून विशेष गस्ती पथक नेमण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तर वनकर्मचाऱ्यांनी गुरुवारी राबविलेल्या शोध मोहिमेत या परिसरातून आणखी तीन लोखंडी तारांचे सापळे हाती लागले. या प्रकरणामध्ये तीन स्थानिक संशयितांना वन विभागाने ताब्यात घेतल्याचे समजते आहे. मात्र वन विभागाकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.

चित्रनगरीत सोमवारी सापळ्यांमध्ये अडकून मृत्यू झालेल्या मादी बिबटय़ा आणि नर सांबराचे कुजलेल्या अवस्थेतील शरीर आढळले होते. या प्राण्यांचा मृत्यू शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकून झाला होता. या प्रकरणामध्ये बिबटय़ाची ११ नखे आणि सांबराचे शिर गायब असल्याने तस्करीचा संशय व्यक्त होत आहे. यासाठी वन विभागाने दोन दिवस राबविलेल्या शोध मोहिमेतून ३० सापळे  मिळाले आहेत.

असा प्रकार पुन्हा भविष्यात घडू नये म्हणून त्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी गुरुवारी वन विभाग आणि फिल्म सिटी प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, ठाण्याचे उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक आणि फिल्म सिटी प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत फिल्म सिटी परिसरातील कचरा नियोजन, सुरक्षा आणि विशेष गस्त पथक याबाबत चर्चा झाली.

मृत मादी बिबटय़ाचे नाव ‘पाणी’

फिल्म सिटी परिसरात सापळ्यात अडकून मृत्यू झालेल्या मादी बिबटय़ाची ओळख पटली आहे. ही मादी ‘एल-२८’ असून तिचे नाव ‘पाणी’ असे असल्याची माहिती वनजीव संशोधक आणि जीवशास्त्रज्ञ निकीत सुर्वे यांनी दिली. या मादीवर आम्ही २०१५ पासून लक्ष ठेवून होतो. तेव्हापासून तिचे वास्तव फिल्म सिटी परिसरात असल्याचे सुर्वे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. यंदा पार पडलेल्या कॅमेरा ट्रॅप प्रकल्पामध्ये ही मादी आपल्या पिल्लासोबत  आढळली होती. गेल्या वर्षी बिबटय़ा गणना प्रकल्पामध्ये या मादीकडून कुत्र्याची शिकार होतानाचे छायाचित्र कैद झाल्याने ती प्रसिद्ध झाली होती.

होणार काय?

सुरक्षेच्या दृष्टीने फिल्म सिटी प्रशासन विशेष गस्त पथके तयार करणार असल्याची माहिती उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. या पथकात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाच्या पाच जवानांचा समावेश असेल. या जवानांना वन विभागाकडून प्रशिक्षण देणार असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबर हे जवान दररोज परिसरात गस्त घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय फिल्म सिटी प्रशासनाने गुरुवारी सर्व चित्रीकरणस्थळांना कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात नोटीस बजावल्या. तसेच सुरक्षेच्या उद्देशाने आदिवासी पाडय़ातील आदिवासींना प्रशासनाकडून ओळखपत्र देण्यात येणार आहेत.