मुंबई : मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि पनवेल येथे एक लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना गुरुवारी उद्याोग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत मान्यता देण्यात आली. सेमीकंडक्टर, विद्याुत वाहन निर्मितीमधील या गुंतवणूक प्रकल्पांतून २९ हजार रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.
उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंटक्टर निर्मितीसाठी पनवेलमध्ये ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी’ व ‘अदानी समूहा’चा संयुक्त प्रकल्प साकारणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५८ हजार ७६३ कोटी तर दुसऱ्या टप्यात २५ हजार १८४ कोटी अशी एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून तेथे १५ हजार रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. पुणे येथे ‘स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया’ कंपनीचा प्रकल्प एकात्मिक पध्दतीने स्थापना करण्यास गुरुवारी राज्य सरकारने मान्यता दिली. या प्रकल्पात १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार असून एक हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्यआहे.
हेही वाचा >>>भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची बदली
प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विद्याुत वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टोयोटा- किर्लोस्कर मोटर कंपनी’चा विद्याुत वाहन निर्मिती प्रकल्पही सुरू होणार आहे. यात २१ हजार २७३ कोटींची गुंतवणूक आणि १२ हजार रोजगार निर्मिती होईल. गुरुवारी मंजुरी मिळालेला तिसरा प्रकल्प वस्त्रोद्याोग क्षेत्रातील आहे. या प्रकल्पाचा सुक्ष्म, लघू व मध्यम उद्याोग घटकांनाही फायदा होणार आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव पेठ अतिरिक्त औद्याोगिक विकास महामंडळ वसाहतीमध्ये ‘रेमंड लक्झरी कॉटन्स’चा स्पिनींग, यार्न डाइंग, विव्हींग ज्यूट, विव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन उत्पादनांचा विशाल प्रकल्प मंजूर झाला आहे. यातून ५५० रोजगार निर्मिती होणार असून त्यासाठी १८८ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्याोग मंत्री उदय सामंत (दूरचित्र संवादाच्या माध्यमातून), मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्याोग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.
मान्यता मिळालेले प्रकल्प
●पनवेल : ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी’ व ‘अदानी समूहा’चा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प
●पुणे : ‘स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया’चा विद्याुत वाहन निर्मिती प्रकल्प
●छत्रपती संभाजीनगर : ‘टोयोटा- किर्लोस्कर मोटर कंपनी’चा विद्याुत वाहन निर्मिती प्रकल्प
●अमरावती : ‘रेमंड लक्झरी कॉटन्स’चा प्रकल्प
सेमीकंडक्टर आणि विद्याुत वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे ‘विद्याुत वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य’ अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण होईल. प्रकल्पांमुळे एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होणार आहे. – एकनाथ शिंदे</strong>, मुख्यमंत्री