बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ अरबाज खान सट्टेबाजीच्या जाळयात सापडला आहे. अरबाजने शनिवारी चौकशी दरम्यान सोनू जालानकडे आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी करत असल्याची कबुली दिली. मागच्या सहावर्षांपासून अरबाज आयपीएल सामन्यांवर सट्टा लावत होता असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.

या सट्टेबाजीमध्ये अरबाजचे २.८० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अरबाज सोनू जालानला ३ कोटी रुपये देणे होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. पैसे दिले नाहीस तर नाव उघड करण्याची धमकी सोनूने अरबाजला दिली होती.

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अरबाजला आज चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी दोघांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालान याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने २९ मे रोजी अटक केली होती.

Story img Loader