मुंबई : तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असून पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलेची सुरक्षा रक्षकांबरोबर बाचाबाची झाली.पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर या वादावर पडदा पडला. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुखदर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा तेथे तैनात महिला सुरक्षा रक्षकाबरोबर वाद झाला.
उभयतांमध्ये धक्काबुकीही झाली. घटनास्थळी तैनात पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले. दरम्यान, महिलेला महिला सुरक्षा रक्षकांनी योग्य प्रवेशद्वारातून येण्याची सूचना केली होती. त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली नाही, असे लालबाग राजाच्या मंडळांकडून सांगण्यात आले.