गुंड अरुण गवळी याची तुरूंगात भेट घेतल्याने अभिनेता अर्जुन रामपालला आता पोलिसांचा ससेमिरा मागे लागला आहे. या भेटीप्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावले आहे.
 अर्जुन रामपाला डॅडी नावाच्या एका चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. याच भुमिके संदर्भात गेल्या आठवडय़ात त्याने तुरुंगात जाऊन गुंड अरुण गवळी याची भेट घेतली होती. त्याची माहिती मिळताच जेजे मार्ग पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यासाठी रामपालला समन्स बजावले आहे. अद्याप रामपालने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. मात्र काही दिवस वाट पाहून पुन्हा त्याला स्मरणपत्र दिले जाईल असे जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मढवी यांनी सांगितले. अरूण गवळी सध्या नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Story img Loader