गुरुदासपूर जिल्ह्यातील दीनानगर हल्ल्याचा तपास अपूर्णच; हल्ल्याच्या शक्यतेची भीती खरी ठरली, संस्थाचे कातडी बचाव धोरण
पाच महिन्यांपूर्वी दिनानगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास अद्यापही अपूर्ण असल्यामुळे अशाच प्रकारचा आणखी एखादा हल्ला होऊ शकतो ही सुरक्षाविषयक तज्ज्ञांची भीती शनिवारी सकाळी पठाणकोट येथील एअरफोर्स स्टेशनवर पाच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे खरी ठरली आहे.
गुरुदासपूर जिल्ह्य़ातील दिनानगर पोलीस ठाण्यावर २७ जुलै २०१५ रोजी तीन दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. यात एका पोलीस अधीक्षकासह सातजण मारले गेले होते. यावेळी झालेल्या चकमकीत तिन्ही दहशतवादीही मारले गेले होते.
या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यास पंजाब पोलिसांनी नकार दिला होता. मात्र पाच महिने उलटून गेल्यानंतरही त्यांना या हल्ल्याच्या तपासाबाबत कुठलीही प्रगती करण्यात अपयश आलेले आहे. दहशतवादी कोणत्या मार्गाने आले होते हेसुद्धा पंजाब पोलीस निश्चित करू शकलेले नाहीत, या वस्तुस्थितीबाबत सुरक्षा तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. देशाच्या सुरक्षेपेक्षा स्वत:ची कातडी वाचवण्याची काही संस्थांना चिंता असल्याचे मत यावरून तयार झाले आहे.
एका देशावर हल्ला झाला आणि ना हल्लेखोर दहशतवाद्यांची ओळख पटली, ना त्यांचा ठावठिकाणा कळला ही गोष्ट अतिशय धक्कादायक आहे, असे पंजाब पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओळख उघड न करण्याच्या अटीवर ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना मान्य केले. पंजाब पोलिसांनी या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्याऐवजी त्यांची सर्व शक्ती हा अधिकारक्षेत्राचा मुद्दा बनवण्यात खर्च केली.
पोलिसांनी या हल्ल्याच्या तपासाकरता अन्वेषण ब्यूरोचे संचालक असलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक सहोटा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. हे पथक नंतर रोहित चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आले. जीपीएस उपकरणांनी दहशतवाद्यांचे ‘लोकेशन्स’ वेगवेगळे दाखवल्याचे सहोटा यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले; मात्र पंजाब पोलिसांच्या या म्हणण्याशी इतर सुरक्षा संस्थांनी मुळीच सहमती दाखवली नाही.
गेल्याच महिन्यात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महानिरीक्षक अनिल पालीवाल यांनी आम्ही संपूर्ण सीमा पिंजून काढली, परंतु दहशतवाद्यांनी पंजाबमधून सीमा पार केल्याचे दाखवणारी कुठलीही चिन्हे आम्हाला दिसली नाहीत. याउलट, दहशतवादी काश्मीर सीमेवरून आले असतील आणि त्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलावरच आहे, या आपल्या भूमिकेला पंजाब पोलीस चिकटून आहेत.मार्ग
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा