लालबाग-परळ विभागातील सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने चार ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करुन दिले आहेत. या वाहनतळांवर एकूण सहा हजार २०० वाहने उभी करण्याची क्षमता आहे. परळ, काळाचौकी आणि भायखळा येथे भेट देणाऱ्या गणेश भक्तांची संख्या लक्षात घेता ही व्यवस्था करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> रेल्वेत मोबाइल चोरांना ऊत ; पाच दिवसांत १६९ मोबाइल लंपास
लालबाग-परळ येथील लालबाग, गणेश गल्ली, राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी गर्दी होत आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पालघर, वसई, विरारमधून मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे लालबाग-परळमध्ये मोठी गर्दी होऊन गणेशोत्सव काळात येथे वाहतूकीची समस्या निर्माण होते. नागरिकांची होणारी गैरसोय तसेच, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेशी चर्चा करुन ही वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या वाहनतळाचा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वापर करावा, असे आवाहन वाहतुक पोलीसांनी केले आहे.
हेही वाचा >>> शालेय विद्यार्थिनीचेमारेकरी अद्याप मोकाट ; गुजरात आणि राजस्थानमध्ये शोध सुरू
१) परळमधील एस. एस. राव रोड, गांधी रुग्णालया जवळील कल्पतरू पे अँड पार्क (क्षमता २०० वाहने),
२) काळाचौकीतील जी. डी. आंबेकर रोड एम.सी.जी. एम. पे ॲन्ड पार्क (लोढा) (क्षमता ५०० वाहने)
३) कॉटनग्रीन रेल्वे स्थानका जवळील कॉटन ग्रीन पे ॲन्ड पार्क (बि.पी.टी.) (क्षमता ५ हजार वाहने)
४) भायखळा पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, बावला कंपाऊंडजवळ एम. सि. जी. एम. पे अॅन्ड पार्क, ( पेननसुलीया लॅन्ड ) (क्षमता ५०० वाहने)