शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक आठच्या वतीने दिपावलीनिमित्त १२ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ‘दीपोत्सव २०१२’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांतर्गत १३ नोव्हेंबर रोजी गिरगावातील साहित्य संघ मंदिरात ‘तेजोमय पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिवसेनाप्रमुखांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बाबुलनाथ मंदिरात १२ नोव्हेंबरपासून सलग अकरा दिवस सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत महामृत्युंजय जपाचे आणि रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.