लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेने लोकल आणि रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. लोकल प्रवाशांना घेराव घालून तिकीट तपासणी केली जात असून तिकीट तपासनीस रेल्वेगाड्यांमध्ये विनातिकीट प्रवाशांची धरपकड करीत आहेत. तिकीट तपासनीसांनी सीएसएमटीवरून गुरुवारी सुटलेल्या आठ रेल्वेगाड्यांमधील १६२ प्रवाशांवर कारवाई करून ७८,५८० रुपये दंड वसूल केला.
मध्य रेल्वेवरील लोकल, रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. रेल्वेगाड्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. लोकल प्रवाशांची रेल्वेगाडीत चढण्यास चढाओढ होत असल्याने आरक्षित तिकीटधारक प्रवाशांना रेल्वेगाडीत चढणे आणि त्यांच्या आसनापर्यंत पोहचणेही अत्यंत त्रासदायक होते. तसेच विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेचा महसूल बुडतो.
आणखी वाचा-वर्षभरात राज्यातील ३,९२७ गृहप्रकल्प पूर्ण; २०२२ मध्ये केवळ १७४९ प्रकल्प पूर्णात्वास
त्यामुळे गुरुवारी गाडी क्रमांक ११००९ सीएसएमटी – पुणे सिंहगड एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१०९ सीएसएमटी – मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १७६१२ सीएसएमटी – नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१३७ सीएसएमटी – फिरोजपूर पंजाब मेल, गाडी क्रमांक १२१११ सीएसएमटी – अमरावती एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १७४११ सीएसएमटी – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२३२२ सीएसएमटी – हावडा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१०५ सीएसएमटी – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमध्ये ३७ तिकीट तपासनीसांच्या पथकाने तिकीट तपासणी केली. यावेळी लोकलचे तिकीट, पास असलेले प्रवासी रेल्वेगाड्यांमधून प्रवास करीत असल्याचे आढळले. एकूण १६२ प्रवाशांना पकडून ७८,५८० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच अशाप्रकारची तपासणी भविष्यातही सुरू राहणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत १,३०० विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ३ लाख ४३ हजार ५१० रुपये दंड वसूल करण्यात आला.