काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झालेला असताना आता हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाकाकडून या प्रकरणामध्ये जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी पोलिसांना पत्र लिहून राहुल गांधींना सावरकरांचा अवमान केल्या प्रकरणी अटक करावी अशी मागणी केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दादरमधील शिवाजी पार्क पोलिसांना पत्र लिहून तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लिहिलेल्या या पत्राच्या विषयामध्ये राहुल गांधी आणि नाना पटोले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पत्रातील मजकूर जसाच्या तसा खालीलप्रमाणे…

Rahul Gandhi Post For Balasaheb Thackeray
Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट; म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि आदित्य..”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मी रणजित विक्रम सावरकर वय ५२ राहणार कमलकुंज, शिवसेना भवन पथ दादर (प) मुंबई ४०००२८ खालीलप्रमाणे गुन्हा दाखल करु इच्छितो.

काँग्रेसचे राहुल गांधी यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी वाशीम येथे जारी सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितली असे खोटे विधान करुन त्यांची बदनामी केली आहे. या शिवाय सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार भारताविरुद्ध काम करीत होते अशी धादांत खोटी विधाने करत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरित अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी विनंती करत आहे.

ही बातमी मी माझ्या दादर येथील निवासस्थानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर पाहिली. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील आज सकाळी (दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी) असेच वक्तव्य करुन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला. हे वृत्त मी दूरदर्शनवर पाहिले.

माझे निवासस्थान आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने ही तक्रार आपल्याकडे नोंदवत आहे. तरी आपण राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती.

काय म्हणाले राहुल?
आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती. त्यांना आंदमानमधील तुरुंगामध्ये कारावासासाठी पाठवण्यात आलं तेव्हापासून ते ब्रिटीशांना चिठ्ठ्या लिहून माफी मागत होते, असं विधान राहुल यांनी आपल्या भाषणामध्ये केल्याने भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधींनी आज दुपारी यासंदर्भातील पत्रकार परिषद घेत सावरकरांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीचाही संदर्भ देत आपलं म्हणणं प्रसारमाध्यमांसमोर मांडलं. मात्र राहुल यांच्या भूमिकेवरुन त्यांना विरोधकांनी लक्ष्य केलं आहे.