बंद दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपीना भांडुप पोलिसांनी नुकतीच अटक केली. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवरून टीका करणाऱ्या अजित पवारांना बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “सत्ता गेल्याने…”

बंद दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपीना भांडुप पोलिसांनी नुकतीच अटक केली. बंद दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपीना भांडुप पोलिसांनी नुकतीच अटक केली. भांडुपच्या भट्टीपाडा परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काही दिवसांपूर्वी तीन चोरट्यांनी चोरी केली होती. दुकानातील मोठ्या प्रमाणावर कपडे आणि रोख रक्कम लुटून त्यांनी पोबारा केला होता. दुकानदाराने केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी या परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाची तपासणी केली. रिक्षातून आलेल्या तिघांनी ही घरफोडी केल्याचे चित्रणात स्पष्ट दिसत होते. अखेर पोलिसांनी रिक्षाच्या क्रमांकावरून आरोपींचा शोध घेतला.

हेही वाचा >>>मुंबईत १०५ कोटी रुपयांची वीज चोरी; बेस्टकडून सात हजार ८६७ वीज चोरांची धरपकड

चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील म्हाडा कॉलनीत राहणारा रफिक खान (२२), नरेंद्र कडू (२२) आणि अनिकेत कांबळे (२७) या आरोपींनी ही घरफोडी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या तिघांना अटक केली असून रफिक रिक्षाचालक आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आरसीएफ,चेंबूर, मानखुर्द, वरळी आणि रेल्वे पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrested accused in house burglary mumbai print news amy