शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलांना खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलवून त्यांच्या लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीला ॲन्टॉप हिल पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरोपीने एका लहान मुलासह आणखी चार मुलींसोबत अश्लील प्रकार केल्याचा संशय आहे. मुलांना अश्लील चित्रफीत दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आरोपीवर असून याप्रकरणी आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई: गोवर विशेष लसीकरण :पहिल्या टप्प्यात राज्यातील एक लाख बालकांचे लसीकरण

पीडित मुलगा साडेतीन वर्षांचा आहे. तसेच पाच ते सात वयोगटातील मुलींसोबतही आरोपीने अश्लील प्रकार केल्याचा संशय आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. एका पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी ॲटॉप हिल पोलिसांनी बलात्कार, लैंगिक अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ डिसेंबर रोजी घडली. पीडित मुले परिसरात खेळत असताना आरोपीने खेळण्याच्या बहाण्याने त्यांना घरी बोलवले. त्यानंतर त्यांना अश्लील चित्रफीत दाखवून वारंवार त्यांच्यावर अत्याचार केला. या प्रकरामुळे मुले घाबरली होती. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास बघून घेईन अशी धमकी त्याने मुलांना दिली होती. हा प्रकार पीडित मुलांच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सोमवारी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात शोध घेऊन आरोपीला सोमवारी अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrested for abusing a minor by showing obscene tapes mumbai print news amy