मुंबईः पत्नीने घटस्फोट दिल्याच्या रागातून ४० वर्षीय व्यक्तीने पत्नी व १२ वर्षांच्या मुलावर ॲसिड फेकल्याचा गंभीर प्रकार सोमवारी वांद्रे परिसरात घडला. या हल्ल्यात पत्नी व मुलगा दोघेही गंभीर भाजले असून त्यांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती स्थीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी ४० वर्षीय आरोपी इशरत शेख याला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी इशरत शेख वांद्रे पूर्व येथील बेहराम पाडा परिसरात वास्तव्याला आहे. पत्नी अंजूम शेख (४०) हिने नुकताच त्याला मुस्लीम रितीरिवाजानुसार खुलानामा (घटस्फोट) दिला होता. त्यामुळे इशरत संतापला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजुम सोमवारी नूरजहाँ गेट येथील घराच्या दरवाज्यात बसली होती. त्यावेळी इशरत तेथे आला व त्याने अंजूम व मुलगा रईस (१२) यांच्या अंगावर ॲसिड फेकले. ॲसिडमुळे भाजलेल्या दोघांनाही तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पोलिसांनी अंजुमला जबाब नोंदवला असता तिने घडलेल्या प्रकार सांगितला. या घटनेबाबत निर्मल नगर पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम १२४(१) अंतर्गत ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी इशरतविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी इशरतला सोमवारी रात्री निर्मल नगर पोलिसांनी अटक केली.

Pune, girl died drowning pune, water tank pune,
पुणे : पाण्याच्या टाकीत बुडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Boyfriend killed girlfriends four year old son after he vomits
उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून,नाशिकमधील आरोपी अटकेत; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
Pimpri chinchwad, sexual assault, 14 year old girl, 14 Year Old Girl assault in Pimpri, Ravet Police station, Damini squad, arrest,
आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे
Rape of minor girls in Vasai and Nalasopara
Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना; सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार
A nine year old girl was sexually assaulted by her father in malad mumbai news
sexually assaulted case: नऊ वर्षांच्या मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
vision women pune, vision young woman pune,
‘आयटी’तील तरुणीची दृष्टी अखेर वाचली! मद्यपीने भिरकाविलेल्या दगडामुळे गंभीर दुखापत; डॉक्टरांच्या ६ महिन्यांच्या प्रयत्नांना यश