मुंबई : कुरार येथे शाळेत जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपीच्या छेडछाडीला कंटाळून ११ वर्षीय मुलगी कंपासपेटीमधील कटरने स्वतःला इजा करत असताना शिक्षकांनी तिला विचारणा केली असता हा प्रकार उघड झाला. अखेर याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तीन मुली ११ ते १२ वयोगटातील आहेत. पीडित मुली माध्यमिक शाळेत शिकत असून खासगी शिकवणीला जातात. या मुली रस्त्याने जात असताना आरोपी नेहमी त्यांचा पाठलाग करायचा. खाऊ व पैसे देण्याच्या बहाण्याने तो त्यांच्या केसांना व अंगाला हात लावत होता. जून २०२३ पासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे मुली त्रस्त झाल्या होत्या. अखेर त्यातील एका ११ वर्षांच्या मुलीने कंपासपेटीमधील कटरने स्वतःच्या हाताला दुखापत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शिक्षकांनी पाहून तिला विश्वासात घेतले असता तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षकांनीही हा प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबियांना सांगितला.

हेही वाचा >>>मुंबई: लोकलमधील मालडब्याचे ज्येष्ठ नागरिक डब्यात रूपांतर करण्यास डबेवाला संघटनेचा विरोध

त्यानुसार त्यांनी कुरार पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आईने इतर नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी खासगी नोकरी करीत असून यापूर्वी त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.