दिशा काते
आकर्षक, देखण्या कीटकांच्या मादियाळीत अव्वल स्थानी असलेला कीटक म्हणजे फुलपाखरू. अंडी, अळी, कोष आणि त्यानंतर मनोवेधक रंगसंगती आणि रुपडे धारण करणाऱ्या फुलपाखराच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘कॉमन सेलर’.
‘कॉमन सेलर’ या फुलपाखराला नेप्टिस हायलास म्हणून देखील ओळखले जाते. हे फुलपाखरू प्रामुख्याने नेपाळसह दक्षिण आशियामध्ये आढळणाऱ्या निम्फॅलिड फुलपाखराची एक उप-प्रजाती आहे. सर्वसाधारणपणे ही फुलपाखरे गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागेवर दिसतात. कॉमन सेलर फुलपाखरे ही दिवसभर सक्रिय असतात. उकाडा असलेल्या दिवसांत उष्णतेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी पंख बंद करून विश्रांती घेऊन उष्णतेपासून स्वत:ला वाचवतात. फुले आणि फळे अशी त्यांची दोन्ही खाद्यो आहेत.
कॉमन सेलर फुलपाखरू हे अतिशय वेगवान पण तुलनेने कमी उडणारे आणि फार उंच न उडणारे फुलपाखरू आहे. अनेकदा ते पानांवर किंवा फांद्यांवर विसावताना दिसते आणि अनेकदा हवेत उंच उडते. हे परिसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. यामधील मादी आणि नर जरी सारखे दिसत असले तरी मादी काहीशी आकाराने मोठी असते. तिची शरीराची वरची बाजू काळी तपकिरी असते. नर पांढऱ्या खुणा असलेले काळे आणि मादी पांढऱ्या खुणा असलेले तपकिरी रंगाचे असतात. पुढच्या पंखापासून सुरू होणारी एक पांढरी रेषा त्यानंतर दोन पांढरे ठिपके असतात. त्यांच्या शरीराची खालील बाजू ही सोनेरी तपकिरी रंगाची असते. तसेच वरच्या पृष्ठभागावर दिसणारे पांढरे ठिपके मध्यभागी अतिरिक्त फिकट रेषांसह दिसतात. हे फुलपाखरु धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे अनेकदा दिसते.
हेही वाचा >>> अधोविश्व: टोळीयुध्दाचा भडका
पावसाळ्यात त्यांच्या शरीराच्या खालच्या बाजूच्या पांढऱ्या खुणा अरूंद होतात. तसेच, डागांवर काळी रेष आणि खालच्या बाजूस पट्ट्या अधिक रुंद होतात. मादी फुलपाखरू हे अंडी घालण्यासाठी झाडावरील योग्य पानाची निवड करून पानाच्या पृष्ठभागाच्या बाजूने ती टोकापर्यंत पोहोचेपर्यंत उलटते. जिथे अंडी नंतर जमा केली जातात. प्रत्येक अंडे हे किंचिंत गोलाकार असते आणि त्याच्या पृष्ठभागावर षटकोनी खड्डे असतात. अंड्यातून बाहेर येण्याचा कालावधी हा साधारण ३ ते ३.५ दिवसांचा असतो. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सुरवंट अंड्याची एक बाजू फोडून बाहेर येतो आणि उरलेले कवच त्याचे पहिले अन्न म्हणून खातो. या फुलपाखराचा सुरवंट हा हिरवा असून त्यावर काळे पट्टे असतात. हे सुमारे २ ते ३ आठवडे वाढते आणि या काळात ५ ते ६ वेळा त्यांची त्वचा गळते. त्यांच्या डोक्याचा भाग तपकिरी ते फिकट तपकिरी रंगात बदलतो. शेवटच्या अळी अवस्थेत यायला त्याला ४ ते ६ दिवस लागतात, सुरवंटाची लांबी २५ मि.मी. पर्यंत वाढते. त्याच्या शरीराचा रंग गुलाबी-पांढरा असतो. एकदा त्याने खाणे थांबवले की तो सुरवंट पानाच्या खालच्या बाजूस एक रेशीम कोष करण्यापर्यंत फिरत राहतो. जिथे तो प्री-प्युपेशन अवस्थेत प्रवेश करण्यासाठी उभा लटकतो.
सुमारे एक दिवसानंतर सुरवंट तुलनेने लहान शरीर आणि किंचित विस्तारीत पंख असलेल्या प्युपामध्ये बदलतो. ५ ते ६ दिवसानंतर, प्यूपा अंधारमय होतो. पुपलमधून दिसणाऱ्या पुढील बाजूच्या वरच्या बाजूस पांढऱ्या खुणा विकसित होतात. दुसऱ्या दिवशी प्रौढ फुलपाखरू कोषातून बाहेर पडते. हे फुलपाखरू सुमारे दोन ते तीन आठवडे जगते.