कुलदीप घायवट

कांदळवनाच्या ठिकाणी, पाणवठय़ाच्या सभोवतालच्या झाडांवर लांब पंख पसरलेल्या अवस्थेत चकचकीत काळय़ा रंगाचा पक्षी दिसतो. साधारणपणे दुरून कावळा किंवा डोमकावळा असल्याचा भास होतो. मात्र हा एक पाणपक्षी आहे. त्याची ओळख पाणकावळा. पाणकावळय़ाच्या शरीर रचनेमुळे तो पाण्यात चपळाईने सूर मारतो. पाण्यात खोल जाऊन मासे पकडतो. पट्टीचा पोहणारा असल्याने त्याला कुशल पाणबुडय़ा म्हणूनही ओळखले जाते. सतत पाण्याजवळ आढळून येत असल्याने आणि कावळय़ासारखा दिसत असल्याने त्याला ‘पाणकावळा’ असे नाव पडले असावे.

Why airplane windows small and round shape
Airplane Windows : विमानाच्या खिडक्या लहान आणि गोल का असतात? जाणून घ्या रंजक कारण
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Ganpati rangoli from betel Leaves
Video : फक्त एका मिनिटात विड्याच्या पानांपासून साकारला गणपती, व्हिडीओ एकदा पाहाच
Baleno, Ciaz, and Ignis also get appealing benefits
भन्नाट ऑफर! Baleno, Ciaz, Jimny सह मारुतीच्या ‘या कार खरेदीवर मिळतेय २.५ लाखांपर्यंतची सवलत, संधी सोडू नका
History of Geography earth Italian scientist Torcelli Blaise Pascal Florine Perrier
भूगोलाचा इतिहास: अदृश्य थरांचा शोध
instant papad chutney taste is amazing try it once
दगडी खलबत्यामध्ये झटपट बनवा पापडाची चटणी! चव एकदम भन्नाट, एकदा खाऊन तर बघा
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा
best valley of flowers to visit during monsoon season
सफरनामा : ‘पुष्प’ राज

पाणकावळय़ाचा समावेश पक्षिवर्गाच्या ‘पेलिकनीफॉर्मिस’ गणाच्या ‘फॅलॅक्रोकोरॅसिडी’ कुलात होतो. जगात या पक्ष्याच्या सुमारे ४० प्रजाती आहेत. पाणकावळा देशात सर्वत्र आढळतो. देशात लहान पाणकावळा, मोठा पाणकावळा, तुर्रेबाज पाणकावळा या पाणकावळय़ाच्या जाती असून या तिघांना अनुक्रमे ‘फॅलॅक्रोकोरॅक्स नायजर’, ‘फॅलॅक्रोकोरॅक्स काबरे’ व ‘फॅलॅक्रोकोरॅक्स फसीकोलीस’ अशी शास्त्रीय नावे आहेत. पाणकावळय़ाला इंग्रजीत ‘कॉर्मोरंट्स’ म्हणतात. तर स्थानिकांकडून त्याला ‘करढोक’, ‘कामरा’, ‘कोकोक’, ‘कारा’ अशा विविध नावांनी ओळखले जाते.

हेही वाचा >>> मुंबई-जीवी : काटय़ांचा पिसारा असलेले साळिंदर

तलाव, सरोवर, ओढे, कालवे व नदी अशा गोडय़ा पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी तो पाहावयास मिळतो. अधिक उंचीच्या पर्वतरांगांमध्ये लहान पाणकावळा आढळत नाही. मुंबईतील पाणथळ भाग, पाणवठे, तलावे, नाले, नदी किनारी पाणकावळे दिसून येतात. लहान पाणकावळय़ाच्या शरीराची लांबी सुमारे दोन फूटांपर्यंत असते तर वजन ४५० ग्रॅम असते. नर व मादी दिसायला सारखेच असतात. दोघांच्या पिसांचा रंग काळा असून त्यावर हिरव्या रंगाची तकाकी असते. चोच तपकिरी व निमुळती असते.

तिच्या टोकावर तीक्ष्ण आकडी असते. गळय़ावर पांढरा ठिपका असतो. पाय आखूड असून बोटे त्वचेने जोडलेली असतात. शेपूट लांब व ताठ असते. अनेकदा मोठा पाणकावळा हा लहान पाणकावळय़ाबरोबर वावरताना दिसतो. विणीच्या हंगामात डोके आणि मान यावर थोडी पांढरी पिसे उगवतात. तुर्रेबाज पाणकावळय़ाचे डोके किंचित त्रिकोणी असते आणि डोळे निळे असतात. त्याला तुर्रेबाज म्हटले जात असले तरी, त्याच्या डोक्यावर तुरा नसतो. परंतु, विणीच्या हंगामात कानाजवळ पांढऱ्या पिसांचा लहान झुबका दिसून येतो. पाणकावळा हा प्रामुख्याने मत्स्यभक्षी पक्षी आहे.

हेही वाचा >>> मुंबई-जीवी : कर्मकांडाचा बळी ठरलेला मांडूळ

माशांबरोबरच लहान खेकडे, बेडूक यांवर उपजीविका करतो. मासे पकडण्यासाठी ते त्यांच्या चोचीचा वापर आकडीप्रमाणे करतात. ते अधिक सराईतपणे आणि जास्त काळ पाण्यात पोहण्यास सक्षम असतात. गढूळ पाण्यातही ते पाहू शकतात. पाणकावळा थैलीसारख्या घशामध्ये पकडलेले मासे साठवून ठेवू शकतात. त्यामुळे एकाचवेळी अनेक मासे पकडून त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यास मदत करतात. ज्यामुळे ते अत्यंत कार्यक्षम शिकारी असतात. माशाला पाण्याखालीच चोचीत आडवा पकडतात. त्याला पाण्याबाहेर आणून हवेत उडवून गिळून टाकतात. पाणकावळा पाणपक्षी असूनही त्याला पंख सुकवण्याची वारंवार आवश्यकता भासते. कारण त्यांच्या तैलग्रंथीतून स्रवणारा स्राव इतर पाणपक्ष्यांच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे त्यांच्या पंखांची जलरोधक क्षमता कमी असते. खूप वेळ पाण्यात पोहल्यावर ते जलाशयाच्या काठी झाडांच्या फांदीवर किंवा एखाद्या खडकावर पंख कोरडे करीत बसलेले असतात.

हेही वाचा >>> मुंबई-जीवी : तेजस्वी सूर्यपक्षी

पाणकावळे पोहण्यासह उत्तम उडतात. त्याच्या मजबूत पंखामुळे ते वेगाने उडू शकतात. समूहाने राहणारा हा पक्षी आहे. पाणवठय़ाच्या सभोवताली असलेल्या झाडांवर अनेक पाणकावळय़ाची घरटी असतात. तसेच बगळे, करकोचा किंवा इतर पाणपक्ष्यांच्या घरटय़ाच्या परिसरात पाणकावळय़ाची घरटी असतात. पाणकावळय़ाचा विणीचा काळ मे-ऑक्टोबर असतो. नर व मादी दोघे मिळून काडय़ाकुडय़ा जमवून वाटीसारखे घरटे बांधतात. मादी निळसर हिरवट रंगाची आणि त्यावर पांढऱ्या-करडय़ा रंगाच्या खुणा असलेली अंडी घालते. पिल्लांनाही मासे खायला दिले जातात. अंटाक्र्टिका वगळता प्रत्येक खंडात पाणकावळय़ाचे अस्तित्व आढळून येते. पाणकावळय़ामुळे अन्नसाखळी संतुलित राखण्यास मदत होते. माशांचे ज्याठिकाणी प्रमाण जास्त त्याठिकाणी त्याची वसाहत मोठी असते. त्यामुळे काही भागात मासेमारी करण्यासाठी पाणकावळय़ाचा वापर केला जातो. मात्र सध्याच्या घडीला पाणकावळय़ाचा अधिवास धोक्यात आला आहे. विकासकामांमुळे कांदळवनाची होत असलेल्या कत्तलीमुळे प्रजनन स्थळांना धोका निर्माण झाला आहे. जलप्रदूषण आणि माशांचे कमी होत चाललेल्या प्रमाणामुळे त्याचे जीवन संघर्षमय झाले आहे.