अनिश पाटील

महादेव बुक बेटिंग अ‍ॅप प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरसह अनेक तारांकित कलाकारांना सक्तवसुली संचलनालय (ईडी) समन्स बजावण्यात आल्यामुळे हे प्रकरण देशभरात चर्चेत आले आहे. पाच हजार कोटींची उलाढाल असलेल्या या प्रकरणात हवाला नेटवर्कद्वारे कलाकारांना रोखीने पैसे देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक कलाकारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
Cyber ​​scam under the pretext of wedding invitation Nagpur news
विवाह निमंत्रणपत्रिकेच्या बहाण्याने सायबर घोटाळा; ‘एपीके फाइल’ने राज्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड
MuleHunter.AI rbi
आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?

सौरभ चंद्राकर हा महादेव अ‍ॅपचा मालक. तो दुबईत बसून महादेव बुक बेटिंग अ‍ॅप चालवत होता. मूळचा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी असलेला सौरभ चंद्राकर तेथे फळांचा रस विकण्याचा व्यवसाय करीत होता. करोनाकाळात टाळेबंदीपूर्वी तो सट्टेबाजीशी संबंधीत व्यक्तींच्या संपर्कात आला. त्यानंतर तो ऑनलाइन बेटिंग व्यवसायात उतरला. त्याने हैदराबादला जाऊन त्याबाबतचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातून बेटिंग अ‍ॅपची निर्मिती झाली. महादेव बुक अ‍ॅप प्रकरण सध्या देशात सध्या खूपच गाजत आहे. यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय आहे.

हेही वाचा >>> मुंबई: आंतरराष्ट्रीय कंपनीची १६ कोटी रुपयांची फसवणूक; कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि भागीदार रवी उप्पल आहे. या संपूर्ण बेटिंग व्यवसायाची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा ईडीला संशय आहे. हे अ‍ॅप युएईमधून चालवण्यात येत असून त्याची संगणकीय यंत्रणा, संकेतस्थळाची यंत्रणा नेदरलँडमध्ये आहे. अ‍ॅपचा प्रचार करण्यासाठी नेपाळ, यूएई आणि श्रीलंका येथे कॉल सेंटर चालवण्यात येत असल्याचा ईडीला संशय आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे या अ‍ॅपची जाहिरात करण्यात येते. त्याला प्रतिसाद दिल्यानंतर ती माहिती कॉल सेंटपर्यंत पोहोचते. तेथून सर्व माहिती दिल्यावर संबंधित व्यक्तीचे आभासी खाते उघडण्यात येते. त्यात रक्कम भरून अ‍ॅपद्वारे बेटिंग केले जाते. या सर्व यंत्रणेमागे देशभरात चार ते पाच हजार पॅनल ऑपरेटर कार्यरत आहेत.  प्रत्येक ऑपरेटर किमान २०० ग्राहक सांभाळतो. हा सर्व व्यवहारचे ३० टक्के ऑपरेटरला मिळतात. उर्वरित रक्कम पुढे पाठवली जाते. आठवडय़ातील सर्व व्यवहार प्रत्येक सोमवारी बंद केले जातात. या अ‍ॅपद्वारे दररोज सुमारे २०० कोटी रुपयांचा फायदा होत असल्याचा अंदाज आहे. महादेव अ‍ॅपचे प्रवर्तक सुमारे ४ ते ५ अ‍ॅप चालवत असल्याचा ईडीला संशय आहे.

हेही वाचा >>> दीड वर्षांनंतर तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी मैत्रिणीविरूद्ध गुन्हा दाखल

 या प्रकरणात रणबीर कपूरसह श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, हिना खान व हुमा कुरेशी यासारख्या तारांकित कलाकारांना ईडीने समन्स बजावले आहे. या कलाकारांनी विविध समाजमाध्यमांवर अ‍ॅपसाठी जाहिरात केल्याचा आरोप आहे. या कलाकारांसह आणखी सुमारे १२ हून अधिक तारांकित कलाकार, खेळांडू या अ‍ॅपच्या समाज माध्यमांवरील प्रचारात सहभागी झाले आहेत. ईडी लवकरच त्याचेही जबाब नोंदवण्याची दाट शक्यता आहे. सध्यातरी सर्व कलाकारांचे साक्षीदार म्हणून  जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हे प्रकरण झारखंड राज्यापुरते मर्यादित होते. पण फेब्रुवारी २०२३ मध्ये चंद्राकरचे यूएईमध्ये लग्न झाले आणि या विवाह सोहळय़ासाठी महादेव प्रवर्तकांनी रोख सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले. कुटुंबातील सदस्यांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खासगी विमान भाडय़ाने घेण्यात आले होते. लग्नात सादरीकरण करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार व गायकांना बोलवण्यात आले होते. लग्नकार्याचे नियोजन, नर्तक, सजावट करणारे यांनाही मुंबईतून बोलावण्यात आले होते. अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंह, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम, अभिनेता पुलकीत, भाग्यश्री, कीर्ती खबंदा, एली अवराम यांनी दुबईमधील लग्नात सादरीकरण केल्यामुळे सर्वच यंत्रणांच्या भुवया उंचावल्या. ईडीच्या तपासात हे सर्व व्यवहार हवालामार्फत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तांत्रिक पुराव्यानुसार, योगेश पोपट यांच्या मेसर्स आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने ११२ कोटी रुपये हवालाद्वारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले गेले आणि ४२ कोटी रुपये हॉटेल नोंदणीसाठी खर्च करण्यात आले. या तारांकित कलाकारांना बहुतांश रक्कम रोखीने देण्यात आली आहे. त्यात इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यामातून या कलाकारांना संपर्क साधण्यात आला. अनेक कलाकारांनी ८० टक्के रक्कम रोखीने व २० टक्के धनादेशाद्वारे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याची सर्व माहिती ईडीच्या हाती लागली आहे. कलाकारांना मिळालेली रोख रक्कम हवाला नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना मिळाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीकडे या लग्नाच्या चित्रफिती आहेत. याप्रकरणी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीशी संबधित व्यक्तींचे जबाब ईडीने नोंदवले आहेत. त्यात या कलाकारांच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती ईडीला मिळाली आहे.  ईडीने मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अ‍ॅप संबंधित प्रकरणात सप्टेंबर महिन्यात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. पोपट या अंगडियाची झडती घेण्यात आली. त्यात दोन कोटी ३७ लाख रुपयांची बेहिशेबी रोख जप्त करण्यात आली.  रायपूर येथील विशेष न्यायालयाने फरार संशयितांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याप्रकरणी झारखंडमधील एका राजकीय सल्लागाराच्या कुटुंबियांचीही ईडीने चौकशी केली आहे. पण या प्रकरणात अभिनेता रणबीर कपूरसह अनेक कलाकारांना समन्स बजावण्यात आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले.

Story img Loader