कुलदीप घायवट

नाजूक अंगकाठीसुंदर आणि तुकतुकीत कांती, काळेभोर रेखीव डोळे, चेहऱ्यावरचे निरागस पण तितकेच उत्सुक भाव असलेला प्राणी म्हणजे चितळ. चपळाई आणि प्रत्येक हालचालीतील डौल, नजाकत नजरबंदी करणारी असते. त्याला पाहताच त्याच्या कोणीही प्रेमात पडावे असा हा मोहक प्राणी मुंबईसारख्या महानगरात आढळतो.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौ. किमी. असून यापैकी १०४ चौ. किमी. क्षेत्रफळावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पसरलेले आहे. मुंबईसह या राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूच्या परिसरात सुमारे दोन कोटी लोकसंख्या आहे. मात्र तरीही या भागात मोठ्या संख्येने तृणभक्षक प्राण्यांचा वावर आहे. बोरिवलीस्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चितळांची संख्या अधिक असून प्रत्येकाला हा प्राणी आकर्षित करतो. राष्ट्रीय उद्यानाच्या आत प्रवेश करताच अगदी काही अंतरावर चितळांची चाहूल लागते. चितळ हा दिनचर प्राणी असून सकाळ आणि सायंकाळी तो उदरभरण करतो. हा प्राणी कळपात राहत असून नर, मादी, पाडस सर्व एकत्र फिरताना दिसतात. त्यामुळे उद्यानात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चितळाचे सौंदर्य, त्याच्या मनोहारी हालचाली न्याहाळता येतात.

हेही वाचा >>> मुंबई : जुन्या कंत्राटदाराला पाचारण, एमटीएनएलकडून दूरध्वनी सेवा अंशत: पूर्ववत

भारतातील जंगलात, प्रामुख्याने व्याघ्र प्रकल्पात चितळ आढळून येतो. राज्यात चितळ सर्वत्र आढळतात. तसेच श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या देशांत हे प्राणी कुरणे आणि मुबलक पाणी असलेल्या वनात मोठ्या संख्येने आढळतात. सस्तन वर्गातील समखुरी गणातील मृग कुलात (सर्व्हिडी) चितळाचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव ‘अॅक्सिस अॅक्सिस’ असे आहे. गर्द तपकिरी रंगावर पांढरे ठिपके असणारे चितळ सगळ्या मृगांमध्ये सुंदर आणि देखणे म्हणावे असेच असते. चितळाचे कान, पोट आणि शेपटीचा आतील भाग पांढरा असतो. पाठीवर डोक्यापासून शेपटापर्यंत एक काळा पट्टा असतो. चितळ नर आणि मादीचा रंग सारखाच असून मादी आकाराने नराहून लहान असते. पूर्ण वाढ झालेल्या नराची खांद्याजवळ उंची सुमारे २ ते ३ फूट असते. नराला दोन शिंगे असून ती साधारण तीन फुटांपर्यंत वाढतात. तसेच या दोन्ही शिंगांना प्रत्येकी तीन टोकदार उपशिंगे असतात. एक कपाळापाशी आणि बाकीची दोन उपशिंगे टोकाला असतात. नरांच्या डोक्यावरील शिंगे दरवर्षी गळून पडतात आणि पुन्हा वाढतात. शिंगे गळून पडण्याचा काळ चितळाच्या स्थानानुसार बदलतो. गळून पडलेली शिंगे पौष्टिक अन्न म्हणून चितळ खातात. मादीला शिंगे नसतात.

हेही वाचा >>> शहरातील एकही भाग प्रदूषण विरहित नाही- उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, वायू प्रदूषणाप्रकरणी स्वतःहून जनहित याचिका दाखल

चितळाच्या एका कळपात साधारण १० ते ५० किंवा त्याहूनही अधिक चितळ असतात. चितळाचा मूळ स्वभाव भित्रा आहे; परंतु तरीही ते लवकर माणसाळतातही. इतर प्राण्यांसोबत वावरतात. वाघ, सिंह, रात्रकुत्री, बिबट्या यांसारख्या प्राण्यांचे चितळ हे भक्ष्य. मात्र इतर प्राण्यांसह वावरत असल्याने शिकार होण्यापासून वाचतात. चितळाचा प्रजनन काळ निश्चित नाही. उन्हाळा, हिवाळ्यात त्यांचे प्रजनन होते. मादी चितळवरून नरांमध्ये झुंजी होतात. या वेळी नर शिंगाचा वापर दुसऱ्या नरावर हल्ला करण्यासाठी करतो. या वेळी वनात शिंगे आपटल्याचा आवाज येत राहतो. मादी चितळ एका वेळी एकाच पाडसाला जन्म देते. दर सहा महिन्यांनी मादी नव्या पाडसाला जन्म देऊ शकते. चितळाचे आयुष्य २० ते ३० वर्षांचे असते. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) रेड लिस्टनुसार चितळ प्रजातींच्या विलुप्ततेबाबत ‘कमी धोका’ असलेल्या प्रवर्गात मोडते. कुरणे, मुबलक पाण्याचे क्षेत्र कायम ठेवल्यास, चितळांच्या संख्येवर कोणताही परिणाम होणार नाही.