जाहिरातविश्वात प्रदीर्घ काळ काम करताना आधी माहितीपटांची निर्मिती आणि हळूहळू वास्तवदर्शी चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन असा श्याम बेनेगल यांचा प्रवास झाला. नऊ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या बेनेगल यांच्या वडिलांच्या व्यवसायामुळे कॅमेरा नावाचे तंत्र फार लवकर त्यांच्या हातात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिकंदराबादमध्ये जन्मलेल्या बेनेगल यांचे वडील श्रीधर बी. बेनेगल हे व्यवसायाने छायाचित्रकार होते. वडिलांच्या कॅमेऱ्याने श्याम बेनेगल यांनी वयाच्या बाराव्या वर्षी पहिली फिल्म बनवली. मात्र, दिग्दर्शक म्हणून चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द तशी उशीरानेच सुरू झाली. १९५९ साली लिंटास या प्रसिद्ध जाहिरात एजन्सीत कॉपीरायटर म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरूवात केली. जाहिरातविश्वात काम करत असतानाच त्यांनी माहितीपट दिग्दर्शित केले. १९६२ साली त्यांनी पहिला गुजराती माहितीपट बनवला. १९६३ साली त्यांनी दुसऱ्या जाहिरात कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. दिग्दर्शक म्हणून ज्या पहिल्या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली, तो बनवण्यासाठी मात्र त्यांना तेरा वर्ष वाट पाहावी लागली.

१९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अंकुर’ या दिग्दर्शक म्हणून त्यांच्या पहिल्या चित्रपटाची पटकथा १३ वर्ष त्यांच्याकडे पडून होती, पण त्यांना निर्माता मिळत नव्हता. अखेर त्यांचा जुना मित्र पुढे आला आणि त्याने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वीकारली. शबाना आझमी, अनंत नाग, साधू मेहेर अशा वेगळ्याच कलाकारांना घेऊन केलेल्या या चित्रपटाने त्यांना पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’ या चित्रपटांना सलग राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचे विषय, त्यांची वास्तवदर्शी मांडणी, प्रस्थापित कलाकारांऐवजी ‘एफटीआयआय’ आणि ‘एनएसडी’ या दोन संस्थांमधून शिकून बाहेर पडलेल्या कलाकारांना दिलेली संधी आणि या चित्रपटांना मिळालेला प्रेक्षक प्रतिसाद तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची मोहोर यामुळे सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी व्यावसायिक चित्रपटांच्या बरोबरीने नव्या प्रवाहातील सिनेमा तोडीस तोड उभा राहिला. हिंदीमधील या नव्या प्रवाहातील सिनेमांची चळवळ समांतर चित्रपट चळवळ म्हणून ओळखली गेली आणि त्याचे प्रणेते म्हणून श्याम बेनेगल यांचे नाव समाजमानसात दृढ झाले. श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शक म्हणून स्वत:ला मर्यादित ठेवले नाही. ते जाहिरात एजन्सीतही कार्यरत होते, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास ९००हून अधिक जाहिराती केल्या. माहितीपट आणि लघुपटांच्या दिग्दर्शनातही ते मनापासून रमले. त्यांच्यावर सत्यजित रे यांच्या चित्रपटांचा अधिक प्रभाव होता.

हेही वाचा >>> श्याम बेनेगल यांचं निधन, समांतर सिनेमा जगणारा सच्चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड…

समांतर चित्रपटांची चळवळ टिकवण्यासाठीचे प्रयत्न

समांतर चित्रपटांसाठी निर्माते मिळवणे हे तेव्हाही आव्हान होते. बेनेगल यांनी कायम स्वतंत्र निर्मात्यांकडून आर्थिक पाठबळ मिळवत चित्रपट निर्मिती केली. किंबहूना समांतर चित्रपटांची चळवळ मागे पडू नये यासाठी त्यांनी ऐंशीच्या दशकात काही काळ आपला मोर्चा दूरचित्रवाहिनीकडे वळवला. त्यावेळी नव्याने ओळख झालेल्या दूरचित्रवाहिनी या माध्यमासाठी त्यांनी ‘यात्रा’ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या गाजलेल्या पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ ही ५३ भागांची मालिकी केली. ‘भारत एक खोज’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. याच काळात त्यांनी ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे (एनएफडीसी) संचालक म्हणून धुरा सांभाळली. दिग्दर्शक म्हणून बेनेगल यांनी स्वत:च्या चित्रपटांची वेगळी शैली सोडली नाही, पण त्यांनी त्या काळात अभिनेते शशी कपूर यांना मुख्य भूमिकेत घेऊन ‘जुनून’ आणि ‘कलियुग’ हे दोन चित्रपट केले. त्यापैकी ‘जुनून’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासह दोन विभागात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. शबाना आझमी – स्मिता पाटील यांचा ‘मंडी’ आणि ‘त्रिकाल’ हेही चित्रपट विषय आणि मांडणीमुळे वेगळे ठरले.

नव्वदच्या दशकांत मुस्लिम नायिकांना मध्यवर्ती ठेवून केलेल्या ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ आणि ‘झुबैदा’ या चित्रत्रयीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. या तिन्ही चित्रपटांचे विषय आणि मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री यासुध्दा भिन्न अभिनयशैली जपणाऱ्या होत्या. फरीदा जलाल यांनी साकारलेली ‘मम्मो’, स्मृती मिश्रा-किरण खेर यांची सरदारी बेगम आणि पहिल्यांदाच व्यावसायिक हिंदी चित्रपटांची वाट वाकडी करून अभिनेत्री करिश्मा कपूरने साकारलेली झुबैदा हे तिन्ही प्रयोग प्रेक्षकांसाठी अनोखा अनुभव ठरले. त्यानंतर ‘सूरज का सातवाँ घोडा’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस : द फरगॉटन हिरो’, ‘वेलकम टु सज्जनपूर’, ‘वेल डन अब्बा’ असे मोजकेच आणि वास्तवदर्शी मांडणीसी कास न सोडणारे चित्रपट त्यांनी केले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची कथा सांगणारी दहा भागांची ‘संविधान’ ही छोटेखानी मालिकाही लक्षवेधी ठरली. गेल्यावर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुजीब : द मेकिंग ऑफ नेशन’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला अखेरचा चित्रपट ठरला.

सेन्सॉर बोर्ड आणि बेनेगल

हिंदी चित्रपटांवर चालणारी सेन्सॉरची कात्री आणि जाचक अटी याविरोधात अनेक चित्रपटकर्मींनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली १ जानेवारी २०१६ रोजी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. बेनेगल यांनी त्याच वर्षी २९ एप्रिलमध्ये आपला अहवाल सरकारकडे सादर केला होता.

समांतर चित्रपट प्रवाहातील खंदा सेनापतीअमोल पालेकर

श्याम बेनेगल हा समांतर चित्रपटांच्या प्रवाहातील अत्यंत खंदा सेनापती होता. त्याच्या जाण्याने खूपच मोठी पोकळी निर्माण झाली आहे.अर्थपूर्ण आणि तरीही लोकांना आवडणारा चित्रपट, असे जे एक छान मिश्रण समांतर चित्रपटाने निर्माण केले होते, त्यात श्यामबाबूंचा मोठा हातभार होता. समस्या निर्माण करणारे चित्रपट आम्हाला आवडत नाहीत, आम्हाला फक्त मनोरंजनच हवे आहे, असा जो एक प्रवाह सुरू झाला – जो आता टिपेला पोचला आहे आणि कलाप्रकाराने फक्त मनोरंजन करावे, बाकी प्रश्नांवर बोलू नये, असे म्हटले जाते – त्याच्या विरुद्ध जाणारी जी समांतर धारा होती, त्याचे श्यामबाबू, बासु चॅटर्जी, हृषीकेश मुखर्जी हे सगळे लोक खंदे पाईक होते. एकेक करत ते गेले; माझ्या स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यातही त्याचा खूप मोठा हातभार होता. माझ्या दिग्दर्शकीय वाटचालीत मी त्याच्याकडून खूप काही शिकलो. त्यामुळे त्याचे जाणे ही माझी स्वत:ची खूप मोठी वैयक्तिक हानी आहे. त्याला खूप मन:पूर्वक श्रद्धांजली आणि मानवंदना!

आमच्या पिढीच्या आशेचे केंद्र

भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये साठोत्तरी कालखंडानंतर तीन दशकांमध्ये नव्या शैलीमध्ये चित्रपटाची कथा सांगणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकांमध्ये श्याम बेनेगल हे बिनीचे शिलेदार होते. समांतर चित्रपटांची जी चळवळ उभी राहिली, त्यामध्ये अदूर गोपालकृष्णन आणि श्याम बेनेगल ही महत्त्वाची नावे आहेत. सामाजिक, राजकीय विषयांची, त्याचप्रमाणे जगण्याच्या पद्धतीमध्ये भारतीय स्त्रीचे होणारे शोषण हे विषय त्यांच्या चित्रपटांमध्ये केंद्रस्थानी राहिले. राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) या संस्थांमधील गुणवत्तेला त्यांनी चित्रपटांमध्ये स्थान दिले. त्यातूनच त्यांच्या ‘अंकुर’, ‘मंथन, ‘मंडी’ यांसारख्या चित्रपटांतून नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, स्मिता पाटील, शबाना आझमी असे कलाकार समर्थपणे भूमिका करणारे कलाकार ठरले. स्त्रीप्रधान कथानकांतून स्त्री जीवनाचे विविध कंगोरे त्यांनी यशस्वीपणे हाताळले. ‘द मेकिंग ऑफ द महात्मा‘, ‘नेताजी बोस : द फरगॉटन हिरो’ अशा चरित्रपटांसह त्यांनी लघुपट निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आमच्या पिढीला बेनेगल हे आशेचे केंद्र राहिले. दुसऱ्याला दाद देण्याची रसिकता असलेल्या बेनेगल यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय), फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया, राष्ट्रीय चित्रपट विकास संस्था (एनएफडीसी) येथील नव्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल यासाठी सदैव भूमिका घेतली. – डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक

नव्या चेहऱ्यांना संधी देणारा दिग्दर्शक

एक उत्तम दिग्दर्शक असलेला श्याम माझा चांगला मित्र होता. गेल्या चार दशकांमध्ये आमची फारशी भेट झाली नव्हती. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, स्मिता पाटील, शबाना आझमी, अनंत नाग, कुलभूषण खरबंदा, नीना गुप्ता अशा अनेक नव्या चेहऱ्यांना त्याने संधी दिली. त्यामध्ये मीही एक होतो. चित्रपट या माध्यमाची ताकद त्याला समजली होती. ‘निशांत’ चित्रपटाची निर्मिती होत असताना गिरीश कर्नाड हा राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा (एफटीआयआय) संचालक होता. त्या वेळी त्याने नसिरुद्दीन शाह याचे नाव सुचविले होते. गंमत म्हणजे नसीर हा त्या वेळी संप करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक होता. पण, त्याच्यातील गुणवत्ता हेरून गिरीशने नसीरचे नाव सुचविले होते. दूरचित्रवाणी माध्यमामध्येही त्याने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. – डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते

कारकीर्द

● चित्रपट : अंकुर (१९७३), निशांत (१९७५), मंथन (१९७६), भूमिका (१९७७), जुनून (१९७८), कलयुग (१९८१), आरोहण (१९८२), मंडी (१९८३), त्रिकाल (१९८५), सूरज का सातवाँ घोडा (१९९३), मम्मो (१९९४), सरदारी बेगम (१९९६), द मेकिंग ऑफ द महात्मा (१९९६), आणि समर (१९९९), झुबैदा (२००१), वेलकम टू सज्जनपूर (२००८), वेल डन अब्बा (२००९), शोर से शुरुआत (२०१६), मुजीब- द मेकिंग ऑफ अ नेशन (२०२३)

● सत्यजित रे, जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर लघुपट

● दूरचित्रवाणी कार्यक्रम : यात्रा (१९८६), कथा सागर (१९८६), भारत की खोज (१९८८), आणि संविधान (२०१४)

● अंकुर या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्करसाठीही शिफारस

● निशांत, मंथन, भूमिका याही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार; मंथनही भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात आला

● सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता

● जुनून आणि कलयुगला सर्वोत्तम चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार

● १९७६मध्ये पद्माश्री, १९९१मध्ये पद्माभूषण

● २००५मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार.

आदरांजली

श्याम बेनेगल यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणीचा वैभवशाली अध्याय संपुष्टात आला आहे. त्यांनी नवीन प्रकारची चित्रपटसृष्टी सुरू केली आणि अनेक कलात्मक चित्रपट तयार केले. त्यांनी अनेक अभिनेते, अभिनेत्री आणि कलाकार घडवले. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

● श्याम बेनेगल यांनी नवीन समांतर चित्रपटसृष्टी सुरू केली. ते नेहमीच अंकुर, मंथन आणि इतर असंख्य चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीची दिशा बदलणारा माणूस म्हणून लक्षात राहतील. त्यांनी शबाना आझमी आणि स्मिता पाटील अशा थोर अभिनेत्यांमधून तारे घडवले. – शेखर कपूर, दिग्दर्शक

● माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या चित्रपटांसाठी धन्यवाद. इतक्या आश्चर्यकारक प्रतिष्ठेने कठीण कथा आणि सदोष पात्रे रेखाटल्याबद्दल धन्यवाद. – हंसल मेहता, दिग्दर्शक

● ते भारतातील समांतर चित्रपटांचे कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी देवदूत होते. त्यांनी भिन्न पद्धतीने कथा सांगितल्या. जेव्हा मी त्यांना मंडीसाठी भूमिका मागायला गेलो तेव्हा त्यांनी मला थांबायला सांगितले आणि त्यानंतर सारांश चित्रपट आला, ते माझ्यासाठी खूप खुश होते. अलविदा श्यामबाबू.– अनुपम खेर, अभिनेता

● भारतीय चित्रपटसृष्टीचे दु:खदायक नुकसान झाले आहे. ते उत्तम कथामांडणी करणारे आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे दूरदर्शी होते. झुबैदासाठी त्यांच्याबरोबर काम करणे हा माझ्यासाठी परिवर्तनकारक अनुभव होता. त्यांच्याकडून शिकलेल्या धड्यांसाठी मी नेहमी कृतज्ञ राहीन. – मनोज वाजपेयी, अभिनेता

● श्याम बेनेगल यांनी एक गोष्टी सर्वोत्कृष्टपणे व्यक्त केली असेल तर ते होते सामान्य चेहरे आणि सामान्य आयुष्यांमधील काव्य! – सुधीर मिश्रा, दिग्दर्शक

● काही जणांना लहानपणीच खूप समृद्ध करणारे अनुभव मिळतात, त्यापैकी मी एक भाग्यवान. त्यांच्या ‘मम्मो’ चित्रपटातील रियाझच्या भूमिकेसाठी माझे नाव त्यांना कुणी तरी सुचवले. पंधराव्या वर्षी मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळाल्याने झालेल्या अभिनय संस्कारासाठी मी कायमचा ऋणी आहे. ‘मम्मो’चे चित्रीकरण मुंबईत झाले. त्या दरम्यान मी भाषेसाठी घ्यायची मेहनत, अभिनयातील सहजपणा, याबाबत जे काही शिकलो, ते आयुष्यभर पुरेल.– अमित फाळके, अभिनेते

● श्याम बेनेगल भारतीय चित्रपटसृष्टीमधील उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. पंडित नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’वर आधारित ‘भारत एक खोज’ आणि संविधान सभेतील चर्चांवर आधारित ‘संविधान’ या मालिका या तरुण प्रेक्षकांसाठी मौल्यवान संदर्भ आहेत. मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस</p>