अंतर्गत भाग :  वांद्रे पूर्वचा परिसर, खार, वांद्रे येथील वसाहती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बेहरामपाडय़ातील बहुमजली इमारतींसाठी हा विभाग जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच येथील अद्ययावत वांद्रे-कुर्ला संकुलासाठीही.. कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या कॉर्पोरेट कंपन्यांकडे जाण्याचा मार्ग बेहरामपाडय़ावरून जातो हे येथील वैशिष्टय़. मुंबईतील ज्ञानपीठ म्हणजे कलिना येथील विद्यापीठ आणि वांद्रे येथील कुटुंब न्यायालयही याच परिसरात येते. झोपडपट्टी पुनर्विकास संस्था आणि ओएनजीसी याच परिसरात शेजारी नांदतात. महापालिकेसोबतच म्हाडा, एमएमआरडीए, राज्य सरकार, संरक्षण दल अशा विविध संस्थांच्या जमिनी व त्यासोबत सेवासुविधा या परिसरात येतात. मात्र बहुतांश वेळा या संस्थांमध्ये समन्वय नसल्याचा फटका एच पूर्वच्या लाखो नागरिकांना बसतो.

  • प्रभागांच्या समस्या

रिक्षाचालकांची मनमानी

वांद्रे-कुर्ला संकुल या अद्ययावत व्यावसायिक परिसराकडे जाण्यासाठी वांद्रे पूर्वेकडून सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागतो. मात्र वांद्रे पूर्वेकडे उतरतानाच दादागिरी करून रिक्षात बसवण्याची धडपड होते. रिक्षांची संख्या व रिक्षावाल्यांची अरेरावी एवढी आहे की या परिसरात इतर कोणतेही वाहन आणणे मुश्कील झाले आहे. अगदी बेस्टची बस पकडण्यासाठीही आता पाच मिनिटे चालून बस आगार गाठावे लागते.

वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे

संपूर्ण शहरात असलेली ही समस्या वांद्रे येथे विशेषत्वाने जाणवते ती पूर्व-पश्चिम उपनगरे जोडणाऱ्या रस्त्यामुळे. कुर्ला, शीवकडून येणारी वाहतूक आणि पश्चिम उपनगरातून आलेली वाहने यामुळे कलानगर परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होते. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत असली तरी डावी, उजवीकडच्या उपमार्गावर वळताना अनेकदा कसरत करावी लागते.

पुनर्विकासाचा तिढा

सांताक्रूझ, खारमधील संरक्षण दलाच्या शेकडो एकर जागेवर अनेक झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. जुन्या वॉर्ड क्रमांक ८६, ८७, ८८ या परिसरात येणाऱ्या या झोपडय़ांना नागरी सुविधा पालिकेकडून पुरवल्या जातात. नगरसेवक निधी खर्च करून येथे सेवा दिल्या जातात. मात्र ही जमीन संरक्षण दलाकडे येत असल्याने अनेक वर्षांपासून या झोपडय़ांचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही.

प्रस्थापितांना आव्हानात्मक स्थिती

कनिष्ठ व मध्यमवर्गीय वस्तीत सेना, मनसे, भाजपचा वरचष्मा, तर मुस्लीमबहुल पॉकेट्समध्ये काँग्रेसचा हात असा येथील परिसर वाटला गेला आहे. मराठी वस्तीतील मते मनसेकडून सेनेकडे किंवा सेनेकडून भाजपकडे सरकू शकतात. मात्र त्याउपर यात फरक होण्याची फारशी शक्यता नाही. बेहरामपाडा व सांताक्रूझ वाकोला परिसरातील मुस्लीमबहुल परिसरात आतापर्यंत काँग्रेसला सहज विजय मिळत होता. मात्र गेल्या काही वर्षांत काँग्रेसकडून होत असलेल्या अपेक्षाभंगाचा दाखला देत किमान वांद्रे येथे एमआयएम व सपा हे दोन्ही पक्ष चंचुप्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

नाल्यातील कचरा

दुतर्फा झोपडय़ांनी बंद करून टाकलेल्या नाल्यांमधील सफाई करणे पालिकेला अवघड होते. त्यातच दोन्ही बाजूंनी वर्षभर भिरकावल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या पिशव्यांनी एच पूर्व विभागातील बहुतांश नाले तुडुंब भरतात. या वर्षी यातील नाल्यांची सफाई करण्यात पालिकेला यश आले असले तरी नाल्याशेजारच्या झोपडय़ा हटवणे शक्य झाले नसल्याने येत्या काळातही नाल्यांच्या सफाईचा मुद्दा केंद्रस्थानी राहील.

बहुमजली झोपडय़ांचे आगार

वांद्रे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला लागूनच असलेला हा परिसर सतत चर्चेत असतो तो येथील पाच-सहा मजल्यांपर्यंत पोहोचलेल्या झोपडय़ांमुळे. या झोपडय़ांना लागलेल्या आगीमुळे वांद्रे येथील स्कायवॉकलाही काही वर्षांपूर्वी झळ बसली होती. गेल्याच महिन्यात येथील एक झोपडी कलंडल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. मात्र तरीही येथील झोपडय़ांची उंची गगनाच्या दिशेने सरकत आहे. अत्यंत दाटीवाटीचा, वस्त्रोद्योग सुरू असलेला अस्वच्छ परिसर म्हणून गणल्या जाणाऱ्या बेहरामपाडय़ाचा प्रश्न सुटण्याऐवजी चिघळत चालला आहे.

पालिका रुग्णालयाची उणीव

या परिसरात सांताक्रूझ येथे व्ही. एन. देसाई रुग्णालय आहे. या रुग्णालयात दहा खाटांचा ट्रॉमा केअर विभाग तयार करण्यात आला असून नवजात बालकांसाठी १५ इन्क्युबेटर बसविण्यात आले आहेत. दहा खाटांच्या डायलिसीस केंद्रांसाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. खार आणि वांद्रे येथील रुग्णांसाठी आणखी एक पालिका रुग्णालय हवे, अशी मागणी आहे.

गृहनिर्माण धोरण

म्हाडा कॉलनीतील इमारतींचा विकास प्रो रेटा चटई क्षेत्राबाबतचे धोरण निश्चित झाले नसल्याने रखडला आहे. सध्याच्या चटई क्षेत्रात बांधकाम करून देण्यात नफा नसल्याने कोणताही विकासक पुढे येत नाही. खेर नगर, विजय नगर, गांधी नगर या परिसरांतील जुन्या इमारतीही गृहनिर्माण धोरणाच्या अनिश्चिततेत अडकल्या आहेत.