मुंबई : ‘एआय’ने घडविलेल्या दृश्यिक-भाषिक चमत्कृती, बहुप्रसवी माध्यमांवरची उच्चरवातील ‘वृत्तविक्री’, समाजमाध्यमांतील गरळ-गजबज आणि रिल्सलालसेच्या कोलाहलात सध्या बातमीवर लक्ष किती वेळ टिकते? या परिस्थितीत वाचकांना बौद्धिक-वैचारिक स्तरावर श्रीमंत करणारा मजकूर सातत्याने देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानांत तसेच पुरवण्यांतून नव्या वर्षात सर्जक आणि सजग सदरांची भेट घडेल.

दैनंदिन घडामोडींवर भाष्य, सजग विचार आणि अचूक माहितीचा हट्ट ‘लोकसत्ता’ धरते. ‘संपादकीय’ आणि ‘विचार’ या पानांवर दरवर्षी जगण्याशी, भवतालाशी एकरूप असलेल्या वाचकस्नेही विषयांना स्थान असते. सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, सामाजिक पटलावर वाचकांना अद्यायावत तपशील देण्याचा आमचा शिरस्ता कायम आहे.

savitribai phule pune university audit news in marathi
संशोधन केंद्रांबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय… होणार काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Loksatta varshvedh magazine release by chief minister devendra fadnavis
‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; अंक लवकरच भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रकाशन
Akshata and sudha Murthy in Jaipur Literature Festival
जयपूर साहित्य महोत्सव : संवाद हाच पालक आणि मुलांमधला महत्त्वाचा दुवा – अक्षता मूर्ती
Ministry of Skill Development launched skill courses in local languages now available in Marathi as well
कौशल्य विकासाचे धडे आता मातृभाषेतून; एनसीडीसीकडून मराठीमध्ये सुविधा
New format of Varshavedha coming soon Complete encyclopedia for students collectors
नव्या स्वरूपातील वर्षवेध लवकरच; विद्यार्थी, संग्राहकांसाठी परिपूर्ण माहितीकोश
state education department big decision vanish blank pages textbooks
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांतून वह्यांची कोरी पाने हद्दपार
Republic Day 2025 video 26 January man holding flag in hand while standing on running bike stunt goes viral on social media on this 76th Republic Day
Republic Day 2025: भारताचा झेंडा घेऊन स्टंट! बाइकवर उभा राहिला अन्…, प्रजासत्ताक दिनी व्हायरल होणारा धक्कादायक VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत ३५ लाख लाभार्थी!

दैनंदिन राजकारणाच्या पलीकडे पाहून वैचारिक समृद्धी वाढवण्याची साधने वाचकांना मिळावीत, यासाठी ‘भुरा’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आणि ‘जेएनयू’तील सहयोगी प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर हे अर्वाचीन तत्त्वविचाराबद्दल वाचकांना सजग करणारे ‘तत्त्वविवेक’ हे सदर ‘लोकसत्ता’साठी दर सोमवारी लिहिणार आहेत. त्याखेरीज, महाराष्ट्रातील ज्ञानमार्गाला वाईची ‘प्राज्ञपाठशाळा’ आणि पुढे मराठी विश्वकोश मंडळ यांतून चालना देणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांची ओळख करून देणारे ‘तर्कतीर्थविचार’ हे लघुसदर सोमवारपासून शुक्रवारपर्यंत दररोज अंकात असेल. तर्कतीर्थांच्या १२५ व्या जयंती-वर्षाचे औचित्य या सदराला असून त्यांच्या विचारांचे संकलन करणार आहेत डॉ. सुनीलकुमार लवटे.

जागतिक राजकारणाच्या ताण्या-बाण्यांमध्ये त्या त्या काळातल्या तंत्रज्ञानाने कशी महत्त्वाची भूमिका बजावली, याचा इत्थंभूत आवाका देणारे ‘तंत्रकारण’ हे सदर कृत्रिम बुद्धिमत्ता व आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयात संशोधन करणारे पंकज फणसे दर बुधवारी लिहिणार आहेत.

‘लोक’ किंवा एखाद्या भूभागातला समस्त समाज हा केवळ समाजशास्त्रज्ञांचा विषय असू शकत नाही… लोकांमध्ये वावरताना, समाजाला साकल्याने समजून घेताना आणि लोकसमूह म्हणून आपण कुठे आहोत याचे आत्मचिंतन करताना अनुभवी पत्रकारांनाही बातम्यांपासून थोडे लांब जाऊन, लोकांविषयी काही महत्त्वाचे सांगावे वाटते. एकविसाव्या शतकाच्या २५ व्या वर्षीदेखील महाराष्ट्राची लोकपरंपरा, लोकधाटी यांतून आपण जे टिकवले ते कसे आणि का टिकले आणि मागे पडले ते आज कुठे आहे, यांचा आलेख मांडणारे ‘लोकलौकिक’ हे पाक्षिक सदर ‘लोकसत्ता’चे मराठवाडा विशेष प्रतिनिधी सुहास सरदेशमुख लिहिणार आहेत, तर याला जोडूनच दुसरे पाक्षिक सदर हे विशेषत: गेल्या २५ वर्षांतील बदलत्या मध्यमवर्गाचा वेध घेणारे असेल. ‘लोक-लोलक’ या शीर्षकाचे ते सदर ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक (पुणे) सिद्धार्थ केळकर लिहिणार आहेत.

हेही वाचा : शुद्ध हवेसाठी गोरगाववासियांची धडपड

ही पाक्षिक सदरे दर शुक्रवारी असतील; तर शनिवारच्या अंकात ‘संपादकीय’ पानावर, साहित्यिक आणि लोककेंद्री साहित्याच्या प्रसारात वाटा उचलणारे ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी आसाराम लोमटे यांचे ‘तळटिपा’ हे साप्ताहिक सदर वाचता येईल. शनिवारीच, ‘काळाचे गणित’ ही दिनदर्शिका व कालगणना यांच्या विकासाविषयीची लघुलेख-मालिका संदीप देशमुख लिहिणार आहेत.

याखेरीज ‘कुतूहल’ या मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने सुरू असलेल्या लघुसदरात २०२५ मध्ये ‘भूशास्त्र’ या विषयाचा सांगोपांग मागोवा घेतला जाईल, तर ‘समोरच्या बाकावरून’, ‘पहिली बाजू’, ‘लालकिल्ला’ आणि ‘चाँदनी चौकातून…’ हे स्तंभ यंदाही राहतील. ‘उलटा चष्मा’, ‘व्यक्तिवेध’, ‘अन्वयार्थ’, ‘विश्लेषण’ आणि संपादकीय ही या पानांच्या मूलभूत चौकटीचा भाग असणारी सदरे कायम ठेवून दर आठवड्याला ताज्या, महत्त्वाच्या विषयांवरील लेख असतीलच.

वाचकलाडके ‘बुकमार्क’देखील यंदादेखील पुस्तक असोशीचा कोपरा जागृत करणारा मजकूर घेऊन येईल.

२०२५मध्ये काय?

एकंदर सहा नवी सदरे ही ‘विचार’ आणि ‘संपादकीय’ या पानांचे यंदाचे आकर्षण असेल. ‘भुरा’ ग्रंथाचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘तत्त्वविवेक’, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांची ओळख करून देणारे डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे ‘तर्कतीर्थविचार’, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे तंत्रज्ञानअंगाने अभ्यास करणारे पंकज फणसे यांचे ‘तंत्रकारण’ यांसह ‘लोकलौकिक’, ‘लोकलोलक’, ‘तळटिपा’ ही खास सदरे असतील.

हेही वाचा : हाजीअली येथील हिरापन्ना शॉपिंग सेंटरमध्ये आग, दोन दिवसांत आगीच्या तीन घटना

पुरवण्यांमध्ये काय?

लोकरंगमध्ये…

‘अन्यथा : स्नेहचित्रे’ या नव्या सदरामधून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर कला, साहित्य, उद्याोग आदी विविध क्षेत्रांत भेटलेल्या दिग्गजांची व्यक्तिचित्रे रेखाटणार आहेत. हे पाक्षिक सदर ‘लोकरंग’ पुरवणीचे यंदाचे हे खास आकर्षण असेल. याशिवाय ‘दर्शिका’ हे समकालीन दृश्यकलेतील स्त्री-प्रतिमांचा मागोवा घेणारे पाक्षिक सदर ‘लोकसत्ता’तील संपादकीय पानांचे समन्वयक आणि दृश्यकला व समाज यांच्या संबंधाचे अभ्यासक अभिजीत ताम्हणे लिहीत आहेत. स्त्री-दृश्यकलावंतांनी साकारलेल्या स्त्री-प्रतिमा, ‘स्त्रीवादी’ ठरलेल्या प्रतिमा यांवर या सदराचा भर राहील. याखेरीज बालमैफल, पुस्तक परीक्षणे आणि नैमित्तिक लेखांचाही समावेश पुरवणीत असेल.

हेही वाचा : ‘म्हाडा’तही लवकरच सामान्यांच्या तक्रार, निवारणासाठी शिखर समिती!

चतुरंगमध्ये…

‘स्त्री चळवळीच्या पन्नाशी’निमित्ताने खास विभाग यंदाच्या पुरवणीत असणार आहे. याशिवाय मनआरोग्य जपणारे, ध्वनिसौंदर्य वाढवणारे, कुटुंबातील नवरा-बायकोचे नातेसंबंध जपण्यात मदत करणारे लेखन वैविध्यपूर्ण सदरांतून ‘चतुरंग’ पुरवणीतून भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक-शाह यांचे आपल्या कारकीर्दीचा आढावा घेणारे ‘संदूक’, अभिनेत्री मुग्धा गोडबोेले यांचे मुक्तचिंतन असणारे ‘बारमाही’ ही सदरे खास आकर्षण असतील. याशिवाय अॅड. निशा शिवूरकर, डॉ. आनंद नाडकर्णी, तृप्ती चावरे-तिजारे, अॅड. रंजना पगार गवांदे, डॉ. संज्योत देशपांडे, डॉ. सरिता नायक आदी मान्यवरांची मांदियाळी या पुरवणीत असेल.

Story img Loader