कैऱ्यांवर रसायने फवारून कृत्रिमरीत्या पिकवणारी टोळी मुंबईत सक्रिय झाली आहे. भायखळा येथील मंडईत अन्न व औषध प्रशासनाने छापा घालून असे ३३ हजार रुपयांचे अपायकारक आंबे जप्त केले. आंब्याच्या वाढत्या मागणीमुळे कैऱ्या कृत्रिमरीत्या झटपट पिकवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जाते. आंब्यावर कॅल्शिअम कार्बाईडची फवारणी करून ते कृत्रिमरीत्या पिकवले जातात. भायखळा येथे असे प्रकार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यांनी या मंडईत छापा घालून ३३ हजारांचे आंबे जप्त केले. हे आंबे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी दोषी आढळल्यास पाच लाखांचा दंड आणि ३ वर्षे कारावासाची तरतूद आहे. कॅल्शिअम कार्बाईड हे रसायन शरीराला अपायकारक असून कुणाला अशा प्रकारांची माहिती मिळल्यास अन्न व औषध प्रशासनाला कळवावे, असे आवाहन सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा