गप्पांसोबतच कविता, नाटक, कथांचे सादरीकरण

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य घरात अडकून बसले असताना कलाकार मंडळींनाही घरात बसून दिवस ढकलावे लागत आहेत. मात्र, या सुट्टीतही या मंडळींनी आपली कल्पकता, क्रियाशीलता, कलागुण वाया जाऊ दिलेले नाहीत. समाजमाध्यमांची मदत घेत कलाकारांचे वेगवेगळे गट सध्या गप्पांचे फड रंगवत आहेत. एवढेच नव्हे तर, कथा, कविता, एकपात्री प्रयोग, गायन, वादन यांच्या ‘ऑनलाइन’ सादरीकरणातून रसिकांनाही मनोरंजनाचा ताजा खुराक ही मंडळी पुरवत आहेत.

काही नाटकवेडय़ा मंडळींनी एकत्र येत ‘कोरंटाईन थिएटर’, ‘कोरोना थिएटर’, ‘पाच चा चहा’ हे उपक्र म सुरु के ले असून याद्वारे कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. वेगळ्या सादरीकरणामुळे या उपक्र मांना प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

करोनामुळे साधारण महिनाभर राज्यातील नाटय़ चित्रपटगृहे आणि मालिका चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प आहे. त्यामुळे या कालावधीत मिळालेल्या वेळम्ेचा सदुपयोग करत रंगकर्मीनी समाजमाध्यमावर काही उपक्र म सुरु के ले आहेत. पुण्यातील ‘थिएटरॉन’ आणि ‘रुमा क्रि एशन’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाच चा चहा’ हा उपक्र म सुरु असून त्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेता चिन्मय मांडलेकर, हरिष दुधाडे, अजय पूरकर ही मंडळी कथा, कविता, गाणी, यांचे वाचन क रतात, अमोघ वैद्य सूत्रसंचालन करतो. यात प्रत्येक भागात एक पाहुणा कलाकार येत असून आतापर्यंत मृणाल कु लकर्णी, कौशल ईनामदार, नेहा जोशी सहभागी झाले आहेत. या उपक्र माबद्दल दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले की, ‘करोनाच्या सुट्टीत एक हलकाफु लका सकारात्मक प्रयोग करण्याचे ठरवले. यासाठी मनोरंजनविश्वातील माझे कलाकार मित्र दररोज पाच वाजता ऑनलाईन एकत्र जमत गप्पांची मैफल रंगवतो’. या उपक्र मात चिन्मय मांडलेकर एखादे व्यक्तीचित्रण, अजय पूरकर संगीत नाटकातील किस्से, दिग्पाल इतिहासातील गोष्टी, तर हरिश एखादे गाण्याचे  सादरीकरण करतो.

याचबरोबर ‘मिकी’, ‘भंवर’ आणि ‘अँथेमा’ या नाटकांचे प्रयोगही होणार आहे. ‘रिडींग रूम विथ शिवानी’ या कार्यक्र मात अभिनेत्री शिवानी गाजलेल्या कथा, कादंबऱ्या यांचे अभिवाचन करते. अभिनेता अभिजीत झुंजारराव यांच्या ‘अभिनय कल्याण’ने ‘कोरंटाईन थिएटर’ सुरु के ले आहे. ‘समाजमाध्यमावर चांगल्या पोस्ट, व्हिडीओ, टाकले जातात. या पोस्टना उत्तम साहित्यीक मूल्य असते. पण दुर्लक्षित राहतात. या उपक्र मात आम्ही पोस्ट, कथा, कविता, नाटकाशी संबंधित गोष्टी सांगत आहोत. या उपक्र मात यात दरवेळी एक पाहुणा कलाकारही असतो. यात अभिनेता सयाजी शिंदे यांनी ‘तुंबाड’ काव्यसंग्रहातील ‘माकड’ ही कविता सादर के ली.

रंगकर्मी युगंधर देशपांडे यांनीही ‘करोना थिएटर’ ची निर्मिती के ली असून याद्वारे कवितांचे अभिवाचन, एकपात्री प्रयोग सादर के ले जातात. आतापर्यंत ललित प्रभाकर, अश्विनी कासार, नंदिता पाटकर, सुशील ईनामदार, अक्षय शिंपी  हे कलाकार यात सहभागी झाले होते.

या शिवाय आरजे असलेली भक्ती मसूरकर ही दररोज पाच वाजता नामवंत कलाकार आणि प्रेक्षक यांच्याशी लाईव्ह गप्पा मारते. नुकतेच तिने अभिनय बेर्डे सोबत गप्पा मारल्या. याचबरोबर आर जे मलिष्का, रौनक हे रेडियोवरील लोकप्रिय चेहरे प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत.

Story img Loader