विशिष्ट उद्देशाने रंगभूमीवर काम करताना ते व्यक्तिकेंद्रित न होता संस्थाप्रधान असावे, कारण काळानुरूप व्यक्ती बदलतात; पण संस्थांचे कार्य अविरतपणे सुरू राहते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांनी शनिवारी केले. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय फेरीच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते.
माझी रंगभूमीवरील आजवरची संपूर्ण कारकीर्द संस्थाप्रधानच राहिली, असे सांगत काकडे म्हणाले, ‘नाटय़ क्षेत्रात प्रा. भालबा केळकर हे माझे गुरू होते. त्यांच्याकडून मिळालेले प्रशिक्षण आणि अनुभवामुळे नाटय़विषयक जाणिवा समृद्ध झाल्या. काही उद्देशाने रंगभूमीवर काम करायचे असेल तर ते संस्थाप्रधान असले पाहिजे, हे उमगले. नाटक म्हणजे केवळ अभिनय नव्हे, त्यात इतर सर्व घटकही तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे प्रसंगी स्वत:ची कल्पकता बाजूला सारून प्राधान्याने नवीन प्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले.’ ‘रंगायन’, ‘आविष्कार’ या संस्थांची स्थापना आणि वाटचालीच्या आठवणींना काकडे यांनी या वेळी उजाळा दिला. विशेषत: रंगायनने प्रायोगिक चळवळीचा पाया रोवला गेला. विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, श्री.पु. भागवत अशा अनेक सर्जनशील व्यक्तिमत्त्वांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली. मात्र दुर्दैवाने सत्तरच्या दशकात आम्ही विभक्त झालो. त्यानंतर आविष्कार संस्थेची स्थापना केली. तिला पुढे चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. गेली ४४ वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. सध्या या संस्थेची सहावी पिढी कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.
‘मी पुण्यामधील पुरुषोत्तम करंडकाशी संलग्न आहे. रौप्यमहोत्सवी वर्षांत राज्यस्तरावर ही स्पर्धा आयोजित करताना जो काही मनस्ताप, व्याप होतो, तो मी सगळा अनुभवला आहे. त्यामुळे ‘लोकांकिका’ पहिल्याच वर्षांत महाराष्ट्रभर सादर होत असल्याचे पाहून मन भरून आले, अशा शब्दांत त्यांनी ‘लोकांकिका’चे कौतुक केले.
संस्थाप्रधान चळवळ रंगभूमीला पोषक
विशिष्ट उद्देशाने रंगभूमीवर काम करताना ते व्यक्तिकेंद्रित न होता संस्थाप्रधान असावे, कारण काळानुरूप व्यक्ती बदलतात; पण संस्थांचे कार्य अविरतपणे सुरू राहते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांनी शनिवारी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-12-2014 at 02:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun kakade prices loksatta lokankika competition