अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीने चौकशीसाठी बोलावल्याने मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता एक नवं वळण लागलं आहे. या चौकशीदरम्यान एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. अनन्याची काल साधारण तीन तास चौकशी सुरू होती. आजही तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबद्दल इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीने आर्यन आणि अनन्या यांचे काही चॅट्स मिळवले आहेत. या चॅट्समधून असं दिसत आहे की, अनन्या आर्यनला गांजा मिळवून देण्यासाठी तयार होती. या चॅट्सबद्दल एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला विचारलं असता, आपण केवळ आर्यनची थट्टा करत होतो, असं उत्तर अनन्याने दिलं आहे.

हेही वाचा – आर्यन खानमुळे अनन्या पांडेही अडचणीत?; NCB ने फोन घेतला ताब्यात; चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीचे एक पथक गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचले आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता अनन्या पांडेचा फोन ताब्यात घेतला आहे. गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील घेतल्या आहेत. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan ananya panday shah rukh khan ncb arthur road jail vsk