शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनावर आज न्यायालय निर्णय देण्यात आला आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. कॉर्डेलिया क्रूझ येथे छापा टाकल्यानंतर त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले.
आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. आजही एनडीपीएस न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला नाही. बुधवारी एनसीबीने कोर्टात आर्यनच्या अशा काही चॅट सादर केले आहेत, जे ड्रग्ज विषयी होते.
आर्यन खानच्या वकिलांनी मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते आता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहे असे म्हटले. काही काळासाठी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागेल.
सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन आणि मर्चंट मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणि धामेचा भायखळा महिला कारागृहात आहेत. आरोपी आर्यन खान आणि इतरांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी), २० (बी), २७, २८, २९ आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्यनच्या जामिनावर विशेष नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कोर्टाने बुधवारी निकाल दिला. आर्यन सोबत, क्रूझमधून आणखी सात लोकांना अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. जामिनावर न्यायालयात गेल्या सुनावणी दरम्यान, एनसीबीने म्हटले की, आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्ज घेत होता असे पुरावे दर्शवतात. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने असेही म्हटले होते की आर्यनच्या ताब्यातून काहीही सापडले नाही, पण त्याच्या चॅटमधून त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे.
याआधी एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे.
एनसीबीने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासलं असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केलं होतं असं समोर आलं आहे. २ ऑक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतल्या ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणं झालं होतं. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती.