मुंबई एनसीबीनं केलेल्या मोठ्या कारवाईत अटक करण्यात आलेला आर्यन खान आणि अरबाज मर्चंट सध्या एनसीबीच्या कोठडीमध्ये आहेत. मुंबईतल्या एका क्रूझवर टाकलेल्या छाप्यामध्ये त्यांना ड्रग्जसोबत अटक करण्यात आल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटनं जामिनासाठी अर्ज केला असून त्यावेळी एक खळबळजनक दावा अरबाजनं केला आहे. एनसीबीनंच तिथे ड्रग्ज ठेवलं असून सीसीटीव्ही फूटेजमध्ये हे दिसून येईल, असा दावा अरबाजनं केल्याचं वृत्त क्विंटनं दिलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे.

९ तासांचं सीसीटीव्ही फूटेज मागितलं

या वृत्तानुसार अरबाज मर्चंटनं बुधवारी जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यासोबतच अरबाजनं मुंबई पोर्ट ट्रस्टमधील इंटरनॅशनल टर्मिनलच्या ग्रीन गेटवरचं CCTV फुटेज देण्याची देखील मागणी केली आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३० मिनिटांपर्यंतचं सीसीटीव्ही फूटेज मिळावं, अशी मागणी अरबाज मर्चंटनं केली आहे. तसेच, सीआयएसएफनं त्याची एक कॉपी ठेवावी, असं देखील अरबाज मर्चंट म्हणाला आहे.

Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
Encounter Specialist Daya Nayak Arrives at Saif Ali Khan home
Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी, तपासाचा व्हिडीओ आला समोर
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, अतिरिक्त न्यायदंडाधिकारी आर. एम. नारळीकर यांनी एनसीबीला सीसीटीव्ही फूटेजसंदर्भात नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. अरबाझ मर्चंटनं आपल्या याचिकेमध्ये म्हटलंय की, “सीसीटीव्हीमधून हे दिसून येईल की प्रवेश करताना माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाहीत आणि ते एनसीबीनंच तिथे प्लांट केले होते”.

आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी

दरम्यान, आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. आर्यन खानची एनसीबी कोठडीची मुदत आज संपत असून एनसीबी कोठडी वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. एनसीबीनं बुधवारी रात्री उशिरा मुंबईच्या वांद्रे परिसरात कारवाई करत एका विदेशी ड्रग पेडलरला अटक केली आहे. तो आर्यन खान आणि अरबाझ मर्चंट यांच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी एनसीबी आर्यन खानची एनसीबी कोठडी वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.

Story img Loader