अमली पदार्थ प्रकरणात आर्यन खान व अरबाज मर्चंटच्या अटकेच्या वेळी के. पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. मात्र यावर आत मनीष भानुशाली यांनी स्पष्टीकरण दिलं असून त्यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचाही उल्लेख स्पष्टीकरण देताना केलाय.
मी तिथे होतो…
“मी एनसीबीच्या लोकांबरोबर छापेमारी करताना नव्हतो. पण माझ्याकडे नवीन नवीन माहिती येत असल्याने त्यांनी मला तुम्ही आमच्या सोबत राहा कारण तुमच्याकडे येत असणाऱ्या माहितीमुळे कारवाई करणं सोपं होईल असं म्हटलं होतं. मला हे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मी असल्याने त्यांना या प्रकरणामध्ये मदत झाली आणि हे सर्व प्रकरण समोर आलं,” असं मनीष यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
मलिक यांचा उल्लेख…
तसेच नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात बोलताना थेट मलिक यांचा उल्लेख करत, “नवाब मलिक यांनी केलेले आरोप एकदम चुकीचा आणि बिनबुडाचा आहे,” असं म्हटलंय.
आमच्या पक्षाचे संस्कार आहेत की…
“माझ्या पक्षाचं या प्रकरणाशी काही घेणं-देणं नाहीय. मी पक्षाचा काही पदाधिकारी नाहीय. मात्र पक्षाचे जे साडेसहा कोटी कार्यकर्ते आहेत त्यांच्यापैकी मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षाचे संस्कार आहेत की देशाविरोधात काहीही होत असेल तर तुमची जबाबदारी असते की त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत,” असं म्हणत याच कारणामुळे आपण तिथे एनसीबीला मदत करण्यासाठी गेलेलो असं मनीष यांनी म्हटलं आहे.
“वानखेडे साहेबांनी चांगला …”
“मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. मी या प्रकरणामध्ये काही चुकीचं केल्याचं मला वाटतं नाही. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या थांबवण्यासाठी मी एनसीबीकडे गेलो. वानखेडे साहेबांनी चांगला पाठिंबा दिला. त्यांच्याकडेही याबद्दल माहिती होती. माझ्याकडे माझ्या एका मित्राच्या माध्यमातून माहिती आली होती,” असंही मनीष म्हणालेत.
मला दूर ठेवा असं म्हणालेलो…
“१ तारखेला माझ्याकडे व्हॉट्सअप चॅट आहेत. २ ऑक्टोबरलाही मला माहिती मिळत होती. मला यापासून दूर ठेवा असंही मी त्यांना सांगितलं. माझं कुटुंब आहे. माझ्या जीवाला धोका असू शकतो असं मी म्हणालेलो आणि तेच होत आहे,” असं मनीष यांनी म्हटलंय.
आर्यन खान येणार अशी माहिती नव्हती
“आर्यन खान असेल याची माहिती मला नव्हती. बाहेरगावातून येणारे लोक असतील ऐवढं मला कळलं. तो मित्र त्या ग्रुपमधील असेल. या ठिकाणी ड्रग्सचा पुरवठा करणारेही येणार असल्याचं समजलं होतं,” असं मनीष म्हणाले आहेत.
…म्हणून मी त्याला पकडलंय असं वाटलं
“छापा टाकून झाल्यानंतर साक्षीदार म्हणून आम्ही सही केली. त्यानंतर आरोपी, साक्षीदार आणि एनसीबीचे अधिकारी ज्या गाडीत जागा मिळेल त्यात बसून एनसीबीच्या कार्यालयात पोहचले. त्यात मी सुद्धा होतो. जागा लहान असल्याने मी आरोपीच्या बाजूने चालताना त्याला पकडलंय असं वाटतंय,” असं स्पष्टीकरणही मनीष यांनी दिलं.