कॉर्डेलिया क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज थेट त्या वादग्रस्त क्रूझ पार्टीमधील व्हिडीओच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला या क्रूझवर एका व्यक्तीसोबत नाचताना दिसत आहे. नवाब मलिक यांनी ही व्यक्ती म्हणजे क्रूझवर ड्रग्ज पार्टी आयोजित करणाऱ्या आयोजकांपैकी एक असणारा काशिफ खान असल्याचा दावा केलाय. नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही त्यांनी काशिफ खान क्रूझवर होतात तर त्याला एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी अटक का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला होता.

मलिक यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सायंकाळी सहा वाजून २६ मिनिटांनी अनेकजण या क्रूझवरील स्विमिंग पूलच्या आजूबाजूला गाण्यांवर नाचत असताना दिसत आहेत. यामध्ये हिरव्या रंगाच्या शर्टमधील व्यक्तीही नाचताना दिसत असून ही व्यक्ती रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्या फॅशन टिव्हीच्या प्रमुखपदी असणारा काशिफ खान असल्याचं मलिक म्हणाले आहेत. त्याचा प्रमुख काशिफ खान हा सेक्स रॅकेट, ड्रग्ज प्रकरणं आणि पॉर्नोग्राफीचे उद्योग करतो असा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

काशिफ खानचे भाजपाच्या अनेकांशी संबंध आहेत. तो क्रुझवरील पार्टीच्या आयोजकांपैकी एक होता. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या पार्टीची आमंत्रणं दिलेली. त्याच्याकडून सेक्स रॅकेटची काम केली जातात, असं मलिक म्हणाले आहेत. “त्या दिवशी काशिफ खान क्रुझवर होता. मिळालेल्या एका व्हिडीओमध्ये ६ वाजून २६ मिनिटांनी ही व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत डान्स करताना दिसत आहे,” असं मलिक म्हणाले. मला वानखेडेंना हाच प्रश्न विचारायचं आहे की हा दाढीवाला कोण आहे? त्याला अटक का झाली नाही? असे प्रश्न नवाब मलिक यांनी गुरुवारी उपस्थित केलेले.

मुंबईमधील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हा दाढीवाला व्यक्ती म्हणजेच काशिफ कान हा पॉर्नोग्राफी, ड्रग्ज आणि सेक्स रॅकेट चालवतो. समीर यांचे त्यांच्याशी चांगेल संबंध आहेत, असं नवाब मलिक म्हणालेत. इतकच नाही तर पुढे बोलताना, काही अधिकाऱ्यांनी मला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अनेकदा काशिफ खानशी संबंधित ठिकाणांवर अनेकदा छापे मारले पण वानखेडेंनी कारवाई करण्यापासून थांबवल्याचं सांगितलं आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. इमानदार अधिकारी असणाऱ्या समीर वानखेडे काशिफ खानला का अटक करत नाहीत?, असा प्रश्न मलिक यांनी विचारलाय.

आधी चार दिवस टीव्हीवर मला धमक्या देण्यात आल्या. वानखेडेंच्या कुटुंबियांनी न्यायालयात जाण्याच्या धमक्या मला दिल्या पण न्यायालयामध्ये वानखेडेच गेले. परवा एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. मलिक यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यापासून रोखण्यात यावं, ट्विटरवर लिहिण्यापासून थांबवावं. हे म्हणजे तुम्ही एखाद्याचा बोलण्याचा अधिकार काढून घेणार का, बोलण्यापासून, लिहिण्यापासून थांबवणं हे स्वातंत्र्य हेरावून घेण्यासारखं आहे, असं नवाब मलिक म्हणालेत. तसेच कोणी कोणाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर वेगवेगळे कायदे आहेत त्याअंतर्गत न्यायालयात जावं असंही ते म्हणाले.

Story img Loader