गुरुवारी म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला. आज २९ ऑक्टोबर रोजी जवळपास २५ दिवसाने आर्यन आपल्या घरी म्हणजेच मन्नत बंगल्यावर परतणार आहे. आर्यन शुक्रवारी म्हणजे आजच घरी येणार असल्याची शक्यता आहे. अर्थात न्यायालयाचे आदेश आल्यानंतर ते तुरुंग प्रशासनाकडे सादर करुन नंतर औपचारिकता पूर्ण केल्यावरच आर्यनची सुटका होणार असल्याने ती शुक्रवारी रात्री उशीरा होणार की शनिवारी सकाळी याबद्दल ही बातमी करेपर्यंत तरी स्पष्टता झालेले नाही. तरी आर्यनच्या त्याच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावर खास विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. पाहा त्याची काही खास दृष्ये…
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.