स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायणसाई यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आसाराम बापूंच्या सूनेनेचं खुद्द छळवणुकीची तक्रार दाखल केलीयं.
लग्नानंतरही आसारामचा मुलगा अर्थात नारायण साईनं अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवल्याची तक्रार नारायण साईच्या पत्नीने केली आहे. तसेच, आपल्या आई वडिलांचा आणि अनेक शिष्यांची संपत्ती या दोघांनी हडप केल्याचा आरोप तिने केला. त्यानंतर जानकीला दूरध्वनीवरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्यामुळे तिने पोलिसांकडे आपल्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणीदेखील केली आहे .
आपल्या शिष्येवर अत्याचार केल्याप्रकरणी सध्या आसाराम तुरुंगात आहे. तर नारायणसाई हा सध्या सुरतमधील कारागृहात आहे.

Story img Loader