महिलांना सर्व मंदिरांमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे, असे मत जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले. शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदी आहे. जर असे असेल तर महिलांना साडेसाती कशी येऊ शकते, असा सवाल आशा भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला. शनीची साडेसाती सर्वांनाच भोगावी लागते. शनीला स्त्रिया चालत नसतील तर मग साडेसातीमध्ये तो स्त्रियांना सोडून पुरूषांच्याच डोक्यावर का बसत नाही?, अशी शंकाही यावेळी आशा भोसले यांनी उपस्थित केली. स्त्री मंदिरात आलेली चालणार नाही, असे कोणत्या देवाने सांगून ठेवले आहे? हे सर्व नियम पुरूषांनी काढले आहेत आणि ते स्त्रियांच्या विरुद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
…तर महिलांना साडेसाती कशी काय येते? – आशा भोसले
स्त्री मंदिरात आलेली चालणार नाही, असे कोणत्या देवाने सांगून ठेवले आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 09-03-2016 at 09:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha bhosle on women entry in temples